क्रीडा

Asian Games 2023 Opening Ceremony : आशियाई क्रीडा स्पर्धेला रंगारंग कार्यक्रमाने झाली सुरुवात

Kiran Mahanavar

Asian Games 2023 Opening Ceremony : जीवनाचे अविभाज्य घटक असलेले पाणी आणि भरती-ओहोटी यावर आधारित थिम सादर करत आणि टिकाऊपणा, साधेपणा तसेच किफायतशीर अशा मूल्यांना चालना देणारा संदेश देत हांग् चौऊ आशियाई क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले. तंत्रज्ञान आणि चीनच्या संस्कृतीची ओळख सादर करणारा हा उद्घाटनाचा हा सोहळा रंगतदार होता.

९० मिनिटांच्या या कार्यक्रमातून चीनने आपला सांस्कृतिक वारसा आणि हजारो वर्षे जुनी जीननशैली आधुनिक तंत्रज्ञानाच्या व्हिज्युअल्सद्वारे सादर केली. पाणी आणि भरती ही उद्घाटन समारंभाची प्रमुख थीम होती. त्यातून आशिया खंडातील प्रगतीचे प्रतिनिधित्व दाखवण्यात आले. जुने बीजिंग शहर, हांग चौऊ शहर आदीमध्ये असलेली जलसंधारण प्रणाली जीवनशैलीवर कशी सकारात्मक परिणाम करते, हे त्यातून दाखवण्यात आले.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाचे कार्यकारी अध्यक्ष रणधीर सिंग, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले.

हरमनप्रीत, लवलिना ध्वजधारक खेळाडूंच्या संचलनात हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि बॉक्सर लवलिना भारतीय पथकाचे ध्वजधारक होते. या स्पर्धेत भारताचा आत्तापर्यंतचा सर्वाधिक संघ सहभागी झाला आहे. ६२५ खेळाडूंपैकी २०० जण उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. उद्या सामने असलेले खेळाडू तयारीत गुंतले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kuwait Fire: हवाई दलाचं 'सुपर हर्क्युलस' विमानाचं कुवेतच्या दिशेनं उड्डाण; भारतीय मजुरांचे मृतदेह आणणार मायदेशी

Maharaj Junaid Khan: आमिर खानच्या मुलाच्या 'महाराज' सिनेमाच्या प्रदर्शनाला हायकोर्टाची स्थगिती! हिंदू गटानं घेतला होता आक्षेप

Navneet Rana: "जनतेने मला का थांबवले अजूनही कळाले नाही," लोकसभेतील पराभवानंतर नवनीत राणा यांची पहिली प्रतिक्रिया

Lionel Messi : आता ते वय राहिलं नाही म्हणत मेस्सीने पॅरिस ऑलिम्पिकमधून घेतली माघार

PM Modi Italy: तिसरा कार्यकाळ सुरू होताच पीएम मोदी परदेश दौऱ्यावर, जाणून घ्या किती महत्त्वाचा आहे इटली दौरा

SCROLL FOR NEXT