क्रीडा

Asian Games 2023: आशियन गेम्समध्ये पाकिस्तानची अवस्था बिकट! बांगलादेशकडून पराभव, झोळी रिकामीच

पाकिस्तान महिला क्रिकेट स्पर्धेत कोणतेही पदक जिंकता आले नाही आणि तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला.

Manoj Bhalerao

Asian Games Cricket:बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघ आशिया चषक 2023 मध्ये अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला. तर निदा दारच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान महिला क्रिकेट संघाला आशियाई क्रीडा 2023 या स्पर्धेत निराश हाती लागली.

या संघाला महिला क्रिकेट स्पर्धेत कोणतेही पदक जिंकता आले नाही आणि तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागल्याने या संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

महिला क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव करून कांस्यपदक पटकावले, तर भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले, तर श्रीलंकेला रौप्यपदक मिळाले.

बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव करून कांस्यपदक जिंकले

आशियाई क्रीडा 2023 स्पर्धेत च्या महिला क्रिकेट स्पर्धेत कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी झाला, परंतु हा संघ हरला आणि हा संघ कांस्यपदक जिंकण्यापासून वंचित राहिला. या सामन्यात बांगलादेश संघाची कर्णधार निगार सुलतानाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी केली, पण संघ 20 षटकात 9 विकेट्सवर अवघ्या 64 धावांवर गारद झाला.

बांगलादेशकडून शोमा अख्तरने पहिल्या डावात सर्वाधिक 3 बळी घेतले, तर पाकिस्तानकडून सदफ शमासने 13 धावा, कर्णधार निदा दारने 14 धावा आणि आलिया रियाझने 17 धावा घेतल्या. बांगलादेशसमोर विजयासाठी 65 धावांचे लक्ष्य होते आणि या संघाने 18.2 षटकात 5 विकेट गमावत 65 धावा करून सामना जिंकला. बांगलादेशकडून सोमा अख्तरने सर्वाधिक नाबाद 14 धावा केल्या तर कर्णधार निगार सुलतानाला केवळ 2 धावा करता आल्या. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT