Asian Games 2023 esakal
क्रीडा

Asian Games 2023 : दिवसाची सुरूवात रूपेरी; नेमबाजीत भारताच्या मिश्र संघाने पटकावले रौप्य पदक

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : भारताने एशियन गेम्स 2023 च्या सातव्या दिवशी रौप्य पदकाने सुरूवात केली. भारताच्या 10 मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरी संघाने भारताला 13 वे रौप्य पदक पटकावून दिले. या संघात सरबजोत सिंग आणि दिव्या यांचा सामावेश होता. सुवर्ण पदकाच्या सामन्यात त्यांना चीनच्या जोडीला पराभूत करता आले नाही. सरबजोत आणि दिव्याने 14 गुण मिळवले तर चीनच्या संघाने 16 गुण मिळवले.

सुवर्ण पदकाचा सामना सुरू झाला त्यावेळी भारताची जोडी सरबजोत सिंह आणि दिव्या यांनी 4 गुणांची आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांनी चीनविरूद्ध ही आघाडी 7 - 5 अशी नेली. मात्र मायदेशात खेळणाऱ्या चीनच्या जोडीने ही पिछाडी भरून काढत भारताला कडवी झुंज दिली अखेर त्यांनी अटीतटीचा झालेला सामना 16 - 14 असा जिंकत सुवर्ण पदकावर कब्जा केला. भारतीय नेमबाजांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

या रौप्य पदकानंतर भारताने आपली पदक संख्या ही 34 वर नेली आहे. भारताने आतापर्यंत 8 सुवर्ण 13 रौप्य आणि 13 कांस्य पदके अशी एकूण 34 पदके जिंकली आहेत. ते सध्या पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT