asian games 2023 squash india dipika pallikal gold medal saurav ghosal finals results Sakal
क्रीडा

Asian Games 2023 : दीपिका पल्लीकल-हरिंदरचे मिश्र दुहेरीत सुवर्ण

स्क्वॉश खेळामध्ये भारताच्या पदकांची पंचमी; सौरव घोषालचेही रुपेरी यश

सकाळ वृत्तसेवा

हांग चौऊ : भारतीय खेळाडूंना गुरुवारी स्क्वॉश या खेळामध्ये दोन सुवर्णपदके जिंकण्याची संधी होती. मिश्र दुहेरीत भारतीयांनी सुवर्णपदक जिंकले, मात्र पुरुषांच्या एकेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दीपिका पल्लीकल व हरिंदरपालसिंग संधू या जोडीने मिश्र दुहेरीत सुवर्णपदकाची कमाई केली. सौरव घोषाल याला पुरुषांच्या एकेरी प्रकाराच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

दीपिका पल्लीकल व हरिंदरपालसिंग संधू या जोडीने अंतिम फेरीच्या लढतीत एफा अझमान-मोहम्मद कमाल या मलेशियन जोडीवर ११-१०, ११-१० असा विजय संपादन केला. भारतीय जोडीने २-० अशा फरकाने मलेशियन जोडीला पराभूत केले. ३५ मिनिटांमध्ये त्यांचा पराभव झाला.

भारताचा अनुभवी खेळाडू सौरव घोषालसमोर पुरुषांच्या एकेरीच्या अंतिम फेरीत मलेशियाच्या एनजी. योव याचे आव्हान होते. सौरव याने पहिला गेम ११-९ असा जिंकत सुवर्णपदक जिंकण्याच्या दिशेने कूच केली, पण त्यानंतर मलेशियाच्या खेळाडूने पुढील तीन गेम ११-९, ११-५, ११-७ असे जिंकत सुवर्णपदकावर हक्क सांगितला. सौरव याला रौप्यपदक मिळाले.

दीपिकाचा पदकांचा षटकार

भारताची ३२ वर्षीय अनुभवी खेळाडू दीपिका पल्लीकल हिने चार आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. दीपिकाने चार स्पर्धांमध्ये एकूण सहा पदकांची कमाई केली. यामध्ये एक सुवर्ण, एक रौप्य व चार ब्राँझपदकांचा समावेश आहे. दीपिकाने यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये मिश्र दुहेरीत सुवर्णपदक आणि सांघिक प्रकारात ब्राँझपदकावर नाव कोरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT