Asian Games 2023 India Vs Pakistan ESAKAL
क्रीडा

Asian Games 2023 : 14 ऑक्टोबरपूर्वीच भारत - पाक थरार! सुवर्ण पदकासाठी एकमेकांना भिडणार; कधी होणार हा सामना?

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 India Vs Pakistan : चीनमधील हांगझू येथे सुरू असलेल्या 19 व्या एशियन गेम्समध्ये आज (दि. 30 सप्टेंबर) भारतीय पुरूष स्क्वॉश संघ हा सुवर्ण पदकासाठी आपला जोर लावले. विशेष म्हणजे भारताचा हा सुवर्ण पदकाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत होणार आहे. याचबरोबर हॉकीमध्ये देखील भारत - पाकिस्तान एकमेकांशी साखळी फेरीत भिडणार आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वनडे वर्ल्डकपमधील क्रिकेटचा सामना हा 14 ऑक्टोबरला होणार आहे. मात्र त्यापूर्वीही भारत - पाकिस्तान सामन्याचा थरार आपल्याला बघायला मिळणार आहे. हा थरार स्क्वॉशच्या बॉक्समध्ये रंगणार आहे. हा सामना HOC Squash Court 1 वर भारतीय वेळेनुसार अंदाजे दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे.

भारतीय पुरूष संघात सौरव घोसाल, अभय सिंह, हरिंदर पाल सिंह आणि महेश मानगावकर यांचा सामवेश आहे. या संघाने सेमी फायनल सामन्यात मलेशियाचा 2 - 0 असा पारभाव केला होता. सौरवने विविध प्रकारात एशियन गेम्समध्ये सातवेळा पदक जिंकले आहे.

भारतीय स्क्वॉश संघाने प्रत्येक एशियन गेम्समध्ये पदक जिंकले आहे. एशियन गेम्समध्ये पुरूष स्क्वॉश संघाचा समावेश 2010 मध्ये करण्यात आला आहे. भारतीय पुरूष स्क्वॉश संघाने 2014 मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.

दुसरीकडे यंदाच्या एशियन गेम्समध्ये पाकिस्तान संघाने सेमी फायनलमध्ये अटीतटीच्या सामन्यात हाँगकाँगचा पराभव केला होता. पाकिस्तानच्या संघात नूर झमान, असिम खान, नासिर इक्बाल आणि फरहान झमान यांचा समावेश आहे.

पाकिस्तान देखील एशियन गेम्समधील त्यांचे स्क्वॉश मधील दुसरे सुवर्ण पदक जिंकण्यासाठी उत्सुक आहे. पाकिस्तान संघ यंदाच्या एशियन गेम्समध्ये आतापर्यंत पराभूत झालेला नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kukadi Project : ‘कुकडी’त उच्चांकी ९३ टक्के पाणीसाठा; प्रकल्पातील धरणे भरल्याने रब्बी हंगामाची मिटली चिंता

Manchar News : उसनवारीच्या धान्यावर भूक भागविण्याची वेळ; आंबेगाव तालुक्यात २२ शाळांचा पुरवठा रखडला

Power Shake-Up in Shirur: शिरूर नगर परिषदेत सत्ताधारी गटाला तडे; शरद पवार गटाचे पाच नगरसेवक बाहेर पडल्याने समीकरणे बदलण्याची शक्यता

PNG Connection : चार लाख सदनिकांना महिनाभरात ‘पीएनजी’ जोडणी अनिवार्य

Rural Heart Attack Care : मंचर उपजिल्हा रुग्णालयातील तातडीच्या ‘थ्रॉम्बोलिसिस’ उपचाराने शेतकऱ्याचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT