asian games 2023 why wrestlers vinesh phogat bajrang punia get exemption for trials sakal
क्रीडा

Asian Games 2023 : बजरंग, विनेशला मिळाली सुट अन् वादाला फुटले तोंड ! राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षकांची संमती नाही ?

राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षकांच्या संमतीशिवाय हा निर्णय घेतल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ऑलिंपिक पदकविजेता बजरंग पुनिया आणि जागतिक विजेती विनेश फोघाट यांना आगामी आशिया क्रीडा स्पर्धेत चाचणीशिवाय थेट प्रवेश देण्याचा निर्णय भारतीय कुस्ती फेडरेशनच्या हंगामी समितीने घेतला. राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षकांच्या संमतीशिवाय हा निर्णय घेतल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

भारतीय ऑलिंपिक असोशिएशनने (आयओए) जाहीर केलेल्या पत्रकात पुरुष फ्रिस्टाईल ६५ किलो आणि महिला ५३ किलो या गटात अगोदरच कुस्तीपटूंची निवड केली आहे. उर्वरित सहा गटांसाठी आता निवड चाचणी होईल, असे स्पष्ट करण्यात आले होते.

पुरुष ६५ किलो हा गट बजरंग पुनिया आणि महिलांचा ५३ किलो गट विनेशचा आहे. आयओएच्या पत्रकात बजरंग आणि विनेश यांच्या नावांचा उल्लेख नसला तरी या दोघांना चाचणीतून वगळण्यात आल्याचे हंगामी समितीतील सदस्य अशोक गर्ग यांनी सांगितले.

हांगझाऊ येथे २३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया क्रीडा स्पर्धेसाठी कुस्तीचा संघ निवडण्याकरिता निवड चाचणी घेण्याचा निर्णय भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने चार दिवसांपूर्वीच घेतला होता. ही निवड चाचणी २२ आणि २३ जुलै रोजी दिल्लीत होणार आहे.

बजरंग आणि विनेशसह सहा कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण सिंग यांच्याविरोधात जंतरमंतर येथे मोठे आंदोलन केले होते. बजरंग आणि विनेश सध्या बुदापेस्ट (हंगेरी) येथे सराव करत आहेत. बृजभूषण यांच्याविरोधातील कुस्तीपटूंची ही लढाई न्यायालयात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT