asian games  sakal
क्रीडा

Asian Games : गतविजेत्या भारतीय हॉकी संघाची आशियाई स्पर्धेतील मोहीम आजपासून

जागतिक हॉकीच्या रँकिंगमध्ये भारताचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे तर उझबेकिस्तानचे मानांकन ६६ वे आहे.

सकाळ वृत्तसेवा

हांग् चौऊ - आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा पुरुष हॉकी संघ गतविजेते म्हणून आपली मोहीम उद्यापासून सुरु करणार आहे. यंदाही सुवर्णपदकाचे लक्ष्य असले तरी प्रमुख लक्ष्य पॅरिस ऑलिंपिकमध्ये पात्रता मिळवण्याचे असणार आहे. उद्या उझबेकिस्तानविरुद्ध सलामीची लढत होत आहे.

जागतिक हॉकीच्या रँकिंगमध्ये भारताचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे तर उझबेकिस्तानचे मानांकन ६६ वे आहे. त्यामुळे भारताचे निर्विवाद वर्चस्व अपेक्षित आहे मात्र या सामन्यात जास्तीत जास्त गोल करुन सरासरी सलामीलाच उंचावण्यावर भर असणार आहे.

या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा संघ पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरणार आहे. भारताच्या अ गटात उझबेकिस्तानसह जपान, पाक, बांगलादेश आणि सिंगापूर यांचा समावेश आहे. तर ब गटात कोरिया, मलेशिया, चीन, ओमन, थायलंड आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे.

ब गटात भारतीय संघच ताकवर असल्यामुळे उपांत्य फेरी निश्चित समजली जात आहे. परंतु हरमनप्रीत सिंग नेतृत्व करत असलेल्या या संघाला जपान आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाककडून आव्हान अपेक्षित आहे. चेन्नईत नुकत्याच झालेल्या आशिया अजिंक्यपद स्पर्धेत भारताला जपानने १-१ असे बरोबरीत रोखल होते. मात्र साखळी सामन्यात भारताने याच जपानचा ५-० असा धुव्वा उडवला होता त्यामुळे भारताला कामगिरीत सातत्य राखवे लागणार आहे.

गेल्या काही सामन्यात पाकवर भारताने निर्विवाद वर्चस्व मिळवलेले असले तरी ही आशियाई क्रीडा स्पर्धा असल्याने भारताला सावध रहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: ''दरी मिटवायची..? दिवाळीच्या फराळाएवढं हे सोपं नाही'', पंकजा मुंडेंच्या भूमिकेवर हाके काय म्हणाले?

Pune News : ट्रस्टच्या जागेत जैन मंदिरच! धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी सादर केला अहवाल

Nilesh Ghaywal : नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनमधील उच्चायुक्तांशी केला पत्रव्यवहार

8th pay commission: जेवढा उशीर तेवढा फायदा! एकरकमी मिळणार 6,00,000 रुपये, किती असेल फिटमेंट फॅक्टर?

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT