Asian Games Squash eSakal
क्रीडा

Asian Games : स्क्वाश फायनल मध्ये भारताने पाकिस्तानला चारली धूळ; मिळवलं गोल्ड मेडल!

Squash : एशियन गेम्समध्ये भारताची घोडदौड सुरूच आहे.

Sudesh

चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताची घोडदौड सुरूच आहे. आज भारताच्या स्क्वाश टीमने पाकिस्तानला धूळ चारत गोल्ड मेडल मिळवलं आहे.

मेन्स स्क्वाश स्पर्धेतील अंतिम फेरीमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली. भारताने 2-1 फरकाने पाकिस्तानवर मात करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

पहिल्या मॅचमध्ये भारताचा महेश विरुद्ध पाकिस्तानचा नासिर अशी लढत पहायला मिळाली. यामध्ये पाकिस्तानने विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र भारताच्या सौरभने पुढील मॅच जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली.

तिसरी मॅच भारताचा अभय आणि पाकिस्तानचा नूर यांच्यामध्ये पार पडली. या मॅचमध्ये पाच गेम्स खेळण्यात आल्या. अटीतटीच्या या सामन्यात अभयने पहिली गेम जिंकत आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये नूरने विजय मिळवला. तिसऱ्या गेममध्ये पाकिस्तानने विजय मिळवत 2-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर अभयने विजय मिळवत 2-2 अशी बरोबरी साधली.

तिसऱ्या मॅचची पाचवी गेम निर्णायक ठरली. या गेममध्ये 12-10 अशा फरकाने विजय मिळवत भारताने ही मॅच आणि स्पर्धाही खिशात घातली.

एशियन गेम्समध्ये 2010 साली भारताच्या स्क्वाश टीमने पहिल्यांदा हजेरी लावली होती. यानंतर प्रत्येक एशियन स्पर्धांमध्ये भारताच्या स्क्वाश संघाने पदक जिंकले आहे. 2014 साली झालेल्या एशियन गेम्समध्ये देखील भारताच्या पुरूष स्क्वाश संघाने सुवर्णपदक जिंकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : अजितदादांना सर्वात मोठा धक्का! पिंपरी-चिंचवडचा निकाल समोर, भाजपची एकहाती सत्ता

Maharashtra Municipal Election Results 2026 : मराठवाड्यातही महायुतीची सरसी ! छ.संभाजीनगरमध्ये भाजप आघाडीवर तर शिवसेना 'इतक्या' जागांवर पुढे

Ichalkaranji Election Result : इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

खासदाराची लेक, माजी आमदाराचा मुलगा अन् अरुण गवळींच्या मुलीला मतदारांनी नाकारलं; दिग्गजांच्या नातलगांचा पराभव

Infosys Share : Infosys साठी तिमाही निकाल ठरले 'गेम चेंजर'! नफा घसरूनही शेअर 5% उसळला; BUY, HOLD की SELL? तज्ञांचा मोठा इशारा

SCROLL FOR NEXT