Asian Hockey Champions sakal
क्रीडा

Asian Hockey Champions : हॉकीच्या मैदानात प्रतिस्पर्ध्यांसाठी रणनीती

आशियाई चॅम्पियन्स करंडकात बदलाचे भारतीय प्रशिक्षकांकडून संकेत

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई : भारतातील चेन्नई शहरात तीन ते बारा ऑगस्टदरम्यान आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेआधी भारतीय संघ या स्पर्धेद्वारे सराव व चाचपणी करणार आहे.

याप्रसंगी भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी आशियाई चॅम्पियन्स करंडकात प्रतिस्पर्ध्यांसाठी विशेष रणनीती आखण्यात येणार असल्याचे स्पष्ट करीत बदलाचे संकेत दिले आहेत.

क्रेग फुल्टन या वेळी म्हणाले, स्पेनमध्ये चार देशांचा सहभाग असलेली आंतरराष्ट्रीय स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेमध्ये आमच्यासमोर तगडे प्रतिस्पर्धी होते; पण दहा दिवसांच्या या दौऱ्यात आमच्याकडून छान खेळ करण्यात आला.

अशाचप्रकारच्या खेळासाठी आम्ही ओळखले जात आहोत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, शतक महोत्सवानिमित्त स्पेन हॉकी संघटनेकडून विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने नेदरलँडसारख्या बलाढ्य संघावर मात केली. भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर राहिला.

दोन महिने महत्त्वाचे ः हरमनप्रीत सिंग

भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग म्हणाला, पुढील दोन महिने भारतीय हॉकी संघासाठी महत्त्वाचे असणार आहेत. चेन्नईमध्ये तीन ऑगस्टपासून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे.

त्यानंतर चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करावयाची आहे, असे तो स्पष्ट करतो. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याचा अनुभव खेळाडूंसाठी मोलाचा ठरणार असल्याचेही त्याच्याकडून सांगण्यात आले.

पाकिस्तानी संघाचे आगमन

पाकिस्तानचा हॉकी संघ मंगळवारी भारतात दाखल झाला. पाकचा संघ अटारी वाघा बॉर्डरच्या सहाय्याने भारतात दाखल झाला. अमृतसरमध्ये प्रवेश केल्यानंतर पाकचे खेळाडू मंगळवारी रात्री चेन्नईला रवाना झाले.

याआधी यजमान भारतासह मलेशिया, जपान व कोरिया या देशांतील खेळाडूही चेन्नईत आले. भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांतील हॉकीपटू बुधवारी सराव करणार आहेत.

भारताची सलामी चीनशी

यजमान भारतीय हॉकी संघाचा सलामीचा सामना ३ ऑगस्ट रोजी चीनशी होणार आहे. पाकिस्तानचा संघ सलामीच्या लढतीत मलेशियाशी दोन हात करील. या स्पर्धेमध्ये सहा देशांचा सहभाग असणार आहे. प्रत्येक देश पाच साखळी फेरीच्या लढती खेळणार आहे. त्यानंतर अव्वल चार देश उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Amba Ghat Road Repair : आंबा घाटात आधुनिक एरडॉक्स प्लेटस्‌चा वापर; खचलेल्या भागात 30 मीटर लांब, 5 मीटर उंच भिंत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT