Asian Para Games  esakal
क्रीडा

Asian Para Games : @111! आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी करत एशियन पॅरा गेम्समध्ये भारताने इतिहास रचला

अनिरुद्ध संकपाळ

Asian Para Games : भारतीय पॅरा अॅथलिट्सनी चीनमधील हांगझू येथे सुरू असलेल्या एशिनय पॅरा गेम्समध्ये इतिहास रचला. भारताने आपली मोहीम 111 पदकांसह यशस्वीरित्या संपुष्टात आणली. भारताने एखाद्या मोठ्या स्पर्धेत केलेली ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. भारताने 29 सुवर्ण पदके, 31 रौप्य तर 51 कांस्य पदके पटकावली.

हांगझू येथे 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या एशियन गेम्समध्ये भारताने 107 पदके जिंकत मोठी कामगिरी केली होती. मात्र एशियन पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी हा माईल स्टोन देखील मागे टाकला. भारत पदक तालिकेत पाचव्या स्थानावर राहिला आहे.

हांगझू येथील एशियन पॅरा गेम्समध्ये चीनने सर्वाधिक 521 पदके जिंकली. त्यांनी 214 सुवर्ण 167 रौप्य आणि 140 कांस्य पदके जिंकली आहेत. पदक तालिकेत इराण 131 पदके (44 सुवर्ण, 46 रौप्य आणि 41 कांस्य) जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. तर जपानने 42 सुवर्ण 49 रौप्य आणि 59 कांस्य पदके जिंकली आहेत. कोरियाने 30 सुवर्ण, 33 रौप्य आणि 40 कांस्य पदके जिंकली आहेत.

पहिल्या ग्वांग्झू एशियन पॅरा गेम्स 2010 मध्ये भारताने 14 पदके जिंकली होती. त्यावेळी भारत गुणतालिकेत 15 व्या स्थानावर होते. त्यानंतर 2014 मध्ये भारत 15 व्या तर 2018 मध्ये नवव्या स्थानावर होता.

भारताने 2010 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत 100 पेक्षा जास्त पदके जिंकली होती. त्यावेळी भारताने 101 पदकांची कमाई केली होती.

हांगझू एशियन पॅरा गेम्समध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारतीय पॅरालम्पिक समितीचे अध्यक्ष दीपा मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, 'आम्ही इतिहास रचला आहे. आमच्या पॅरा अॅथलिट्सनी देशाचा गौरव वाढवाल आहे.'

आता पॅरिस पॅरालम्पिकमध्ये टोकियोपेक्षा जास्त पदके जिंकणार. आम्ही आमच्या या कामगिरीमुळे आश्चर्यचकीत झालेलो नाही. आम्हाला 110 ते 115 पदके मिळण्याची अपेक्षा होतीच 111 हा शुभ आकडा आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT