Asian Para Games  esakal
क्रीडा

Asian Para Games : निशाद कुमारने उंच उडीत विक्रमासह पटकावले सुवर्ण पदक

अनिरुद्ध संकपाळ

Asian Para Games : हांगझू येथील एशियन पॅरा गेम्स 2023 मध्ये भारताच्या निशाद कुमारने पुरूष उंच उडी T47 प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. त्याने 2.02 मीटर उंच उडी मारत एशियन पॅरा गेम्समध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली.

यापूर्वी एशियन पॅरा गेम्समध्ये भारताने उंच उडी आणि क्लब थ्रोमध्ये सर्व तीनच्या तीन पदके जिंकण्याचा पराक्रमक केला आहे. पुरूष क्लब थ्रो F5 प्रकारात प्रणव सूरमाने सुवर्ण पदकाची कमाई केली. तर धरमबीर आणि अमित कुमार हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले.

एशियन पॅरा गेम्समध्ये पुरूष उंच उडीत शैलेश कुमारने 1.82 मीटर उंच उडी मारत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. त्याने T63 प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. तर भारताच्याच मरियप्पन थांगावेलूने 1.80 मीटर उंच उडी मारत रौप्य पदक पटकावले. कांस्य पदरावर देखील भारतातीच मोहर उमटली. गोविंदभाई पाधियारने 178 मीटर उंच उडी मारत कांस्य पदकावर कब्जा केला.

याचबरोबर भारताच्या पुरूष शूट पुट F11प्रकारात मोनू घानगासने (12.33m) कांस्य पदक पटकावले. महिला कॅनोए VL2 (नौका विहार) प्रकारात प्राची यादवने 1:03.147 वेळ नोंदवत रौप्य पदक पटकावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujani Dam: निम्माही पाऊस नाही, तरी उजनी धरण फुल्ल! १६ दरवाजे उघडले, भीमेत ४० हजार क्युसेक विसर्ग

Saransh Jain: वडिलांनी मुलासाठी कॅन्सरच लपवला! आज तोच खेळाडू टीम इंडियात; भावूक कहाणी डोळे पाणावेल

Latest Live Updates Marathi : सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत- आदित्य ठाकरे

World Hepatitis Day 2026: फॅटी लिव्हर आणि हेपॅटायटिस एकाच वेळी असू शकतात का? डॉक्टर काय सांगतात, जाणून घ्या

Ahilyadevi Holkar Loan Waiver : बोटांचे ठसे उमटत नाहीत? चिंता नको! कर्जमाफीच्या आधार प्रमाणीकरणासाठी प्रशासनाने दिला 'हा' महत्त्वाचा पर्याय, जाणून घ्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT