Asian Para Games  esakal
क्रीडा

Asian Para Games : अवनीचा 'सुवर्ण'वेध; 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग प्रकारात भारताला मिळालं गोल्ड

Asian Para Games: India won gold in 10m air rifle standing category...

अनिरुद्ध संकपाळ

Asian Para Games : हांगझू येथे सुरू असलेल्या चौथ्या एशियन पॅरा गेम्समध्ये भारताची शूटर अवनी लेखराने R2 10 मीटर एअर रायफ्ल स्टँडिंग SH1 प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. अवनी ही केंद्र सरकारच्या टॉप स्कीमची खेळाडू आहे. भारताचे ही एशियन पॅरा शूटिंगमधील दुसरे पदक आहे.

अवनीने एकूण 249.6 गुण मिळवत एशियन पॅरा गेम्समध्ये नवे रेकॉर्ड प्रस्थापित केलं. अवनीच्या आधी शूटिंगमध्ये रूद्रांशने मिश्र 50 मीटर पिस्टल SH1प्रकारात भारताला कांस्य पदक पटाकावून दिलं होतं.

भारताने आज एशियन पॅरा गेम्समध्ये उंच उडीत दमदार कामगिरी केली. निशाद कुमारने पुरूष उंच उडी T47 प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. त्याने 2.02 मीटर उंच उडी मारत एशियन पॅरा गेम्समध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. तर राम पालने देखील उंच उडी T47 प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली.

याचबरोबर भारताने उंच उडी आणि क्लब थ्रोमध्ये मोठी कामगिरी केली आहे. भारतीय पुरूष संघाने तीनही पदके आपल्या नावावर केली आहे. पुरूष क्लब थ्रो F5 प्रकारात प्रणव सूरमाने सुवर्ण पदक तर धरमबीर आणि अमित कुमार हे अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकावले.

शैलेश कुमारने एशियन पॅरा गेम्समध्ये पुरूष उंच उडीत 1.82 मीटर उंच उडी मारत रेकॉर्ड प्रस्थापित केले. त्याने T63 प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. तर मरियप्पन थांगावेलूने 1.80 मीटर उंच उडी मारत रौप्य पदक तर गोविंदभाई पाधियारने 178 मीटर उंच उडी मारत कांस्य पदकावर कब्जा केला.
(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT