क्रीडा

भारताला वीरेशच्या ब्रॉंझचे समाधान 

दिनेश गुंड

नवी दिल्ली- स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ग्रीको रोमन प्रकारात एक सुवर्ण, दोन रौप्य, एक ब्रॉंझ अशी चार पदकांची कमाई करणाऱ्या भारताला दुसऱ्या दिवशी याच प्रकारातील वीरेश कुंडूच्या एकमात्र ब्रॉंझपदकावर समाधान मानानवे लागले. स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी बुधवारी अन्य वजनी गात भारताला अपयशाचाच चेहरा बघावा लागला. ग्रीको रोमन प्रकारात इराणने 225 गुणासंह विजेतेपद पटकावले. कझाकिस्तान 147 गुणांसह दुसरे आले. भारतालाच चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

येथील खाशाबा जाधव कुस्ती संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी एकेक मल्ल पराभूत होत असताना 97 किलो वजनी गात वीरेश कुंडू याने भारताला ब्रॉंझपदकाचे समाधान दिले. ब्रॉंझपदकाच्या लढतीत त्याने जेऑन क्वॉन याचा 14-5 असा गुणांवर पराभव केला. कोरियन जेऑन याची सुरवात भन्नाट होती. पहिल्या 30 सेकंदातच जेऑनने ढाक डावावर 2 गुणांची कमाई केली. मात्र वीरेशने नंतर आक्रमक पवित्रा घेत त्याच्यावर ताबा मिळवून दोन गुणांची कमाई केली. लगोलग भारदंजा डावावर त्याने दोन वेळा दोन गुण मिळवून पहिल्या फेरी अखेरीस 2-6 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत जेऑनने पुन्हा ढाक डाव टाकण्याचा प्रयत्न वीरेशने असफल ठरवून 2 गुण मिळविले. त्यानंतरही हीच आक्रमकता कायम ठेवत त्याने भारंदजा डावाचा सुरेख वार करून झटपट गुणांची कमाई केली. या दरम्यान लढतीवरील वीरेशचे नियंत्रण सुटल्यामुळे पंचांनी जेऑनला एक गुण दिला. लढतीत 10-3 असे असताना जेऑनने ताबा मिळवत दोन गुणांची कमाई केली. मात्र अखेरच्या टप्प्यात वीरेशने थ्रो मारून चार गुणांची कमाई करत तांत्रिक गुणाधिक्‍यावर विजय मिळविला. 

सचिन राणा याने 60 किलो वजनी गटात चीनच्या जेमिन रेहेती याच्यावर 3-1 असा विजय मिळवून झकास सुरवात केली. पण दुसऱ्या फेरीत त्याला उझबेकिस्तानच्या तुराबेक याच्याडून 7-10 असा पराभव पत्करावा लागला. मलकित हुडाने 67 किलो वजनी गटात इराणच्या अली महंमद याच्यावर 5-0 असा विजय मिळवून चमकदार सुरवात केली. दुसऱ्या फेरीत त्याने तुर्कमेनिस्तानच्या इझिमोह याला 2-0 असे हरवले. मात्र उपांत्य फेरीत त्याला किर्गिझस्तानच्या खालमुरत याच्याकडून 0-9 असा पराभव पत्करावा लागला. 

स्पर्धेतील आणखी एका 72 किलो वजनी गटात कुलदीप मलिकला दुसऱ्याच फेरीत इराणच्या अमिनकडून 8-0 असा पराभव पत्करावा लागला. अमिनने अंतिम फेरी गाठल्याने त्याला रिपेचेजमध्ये खेळण्याची संधी मिळाली. पण तेथे तो उझबेकिस्तानच्या अलिजॉनकडून 8-0 असा पराभूत झाला. संजितला 82 किलो वजनी गटात पहिल्याच फेरीत उझबेकिस्तानच्या मुझाफेरबेककडून 8-0 अशा पराभवासा सामोरे जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT