in Asian Wrestling sajan get historic gold
in Asian Wrestling sajan get historic gold 
क्रीडा

आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या साजनला सुवर्ण

दिनेश गुंड

नवी दिल्ली - आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेत भारताने पहिल्या दिवशी एका सुवर्णपदकासह दोन रौप्य आणि एक ब्रॉंझपदक मिळविले. ग्रिको रोमन गटातील लढतीत 77 किलो वजनी गटात साजन सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. 55 किलो वजनी गटात विजय आणि 130 किलो वजनी गटात आर्यन पन्वर रौप्यपदकाचा मानकरी ठरला. स्पर्धेतील 87 किलो वजनी गटात सुनिल कुमारला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. पहिल्या दिवशी इराणचे वर्चस्व राहिले. त्यांनी तीन सुवर्णपदके मिळविली. 

भारताच्या साजनने सुवर्णपदकाची लढत जिंकताना इराणच्या शायन हुसेन अफिफी याला हरवले. संथ सुरवात करताना निष्क्रिय कुस्ती करण्याचा फटका शायनला बसला. त्याच्याविरुद्ध साजनला एक गुण गेण्यात आला. पण, साजन या संधीचा फायदा घेऊ शकला नाही. लढतीच्या 2.30 मिनिटानंतर शायनने थ्रो करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी साजनचा बचाव निर्णायक ठरला. त्याने झटकन पकडीतून सुटका करत शायनचा ताबा मिळवत दोन गुण मिळवले. पहिल्या फेरीस त्याने मिळविलेली 3-0 ही आघाडी पुढे जाऊन निर्णायक ठरली. दुसऱ्या फेरीत साजनने आक्रमक खेळत आपली आघाडी भक्कम ठेवत विजय मिळविला. 

विजयने 55 किलो गटात अंतिम फेरीतपर्यंत मजल मारली. पण, सुवर्णपदकाच्या लढतीत तो इराणच्या पौय मोहमद नासेरपौरविरुद्ध एकतर्फी लढतीत 0-8 असा हरला. आर्यन 130 किलो वजनीन गटात इराणच्याच अमिन मिणर्झाझादेकडून 1-2 असा निर्णायक लढतीत पराभूत झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT