Asia Youth Athletics sakal
क्रीडा

Asia Youth Athletics : पालघरच्या ईशाला रौप्य, सातारच्या अनुष्काला ब्राँझ

महाराष्ट्रीयन खेळाडूंनी मुलींच्या चारशे मीटर शर्यतीत अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदकाची कमाई केली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कुवैत येथे सुरू असलेल्या आशियाई युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन महाराष्ट्रीयन खेळाडूंनी मुलींच्या चारशे मीटर शर्यतीत अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदकाची कमाई केली. पालघर जिल्ह्यातील ईशा जाधवने रौप्य तर सातारा जिल्ह्यातील अनुष्का कुंभारने ब्राँझपदकाची कमाई केली.

राष्ट्रीय युवा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या १६ वर्षीय ईशाने ५६.१६ सेकंद अशी वेळ दिली. पंधरा दिवसापूर्वी आपला सोळावा वाढदिवस साजरा करणाऱ्या ईशाची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होय. ती आता मिडले रिले शर्यतीतही सहभागी होणार आहे. कऱ्हाड (जि. सातारा) येथे माजी राज्य क्रीडा मार्गदर्शक बळवंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या अनुष्काने ५७.३६ सेकंद अशी वेळ दिली. तिने जुलै महिन्यात कोलंबिया येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर स्पर्धेतही भाग घेतला होता.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आकाश यादवने १९.३७ मीटरवर गोळा फेकून भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. यात भारताच्या सिद्धार्थ चौधरीने ब्राँझपदकाची कमाई केली. त्याने १९ मीटर अंतरावर गोळा भिरकावला. दुसरे सुवर्णपदक मुलांच्या पंधराशे मीटर शर्यतीत मिळाले. त्यात अमित चौधरीने अव्वल स्थान प्राप्त केले.

त्याने ४ मिनीटे ०४.५९ सेकंदात शर्यत पूर्ण केली. मुलींच्या थाळीफेकीत निकीता कुमारीला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. तिने ४४.१४ मीटर अंतरावर फेक केली. राष्ट्रीय स्पर्धेत लक्षद्वीपसाठी पदक जिंकणारी पहिली खेळाडू ठरलेल्या मुबस्सिना मोहमने लांब उडीत ५.९१ मीटर अंतरावर उडी मारली आणि पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्याची किमया केली. मुलांच्या पोल व्हॉल्टमध्ये कुलदीप कुमारने ब्राँझपदकाची भर घातली. त्याने ४.८० मीटरची कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT