ausvsind 
क्रीडा

Aus vs Ind 3rd Test Day 3 Live : अश्विननं घेतली वॉर्नरची फिरकी, टीम इंडियाला दुसरे यश

सकाळ ऑनलाईन टीम

Aus vs Ind 3rd Test Day 3 :  भारतीय संघाचा पहिला डाव 244 धावांत आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. मोहम्मद सिराजने सलामीवीर आणि कसोची पदार्पणात अर्धशतकी खेळी करणाऱ्या विल पुलोवस्कीला बाद करत भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले आहे. संघाच्या धावफलकावर 16 धावा असताना पुलोवस्कीने विकेट गमावली. त्याने 10 धावा केल्या. अनुभवी फिरकीपटू अश्विनने डेविड वॉर्नरला पायचित करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. वॉर्नर अवघ्या 13 धावा करुन माघारी फिरला आहे.

हेजलवूडने धावबादच्या रुपात हनुमा विहारीला बाद केले. त्याने 38 चेंडू खेळून केवळ 4 धावांची भर घातली. त्यानंतर ऋषभ पंतने पुन्हा एक संधी दवडली. 67 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने 36 धावा करणाऱ्या पंतला हेजलवूडने तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या बाजूला नांगर 
टाकून उभा असलेल्या पुजाराचा संयम तोडण्यात कमिन्सला यश मिळाले. उसळत्या चेंडूवर ग्लोव्जला चेंडू लागून त्याने यष्टीमागे झेल दिला. 176 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने त्याने 50 धावा केल्या. धावफलकावर 206 धावा असताना अश्विनच्या रुपात भारतीय संघाला 7 वा धक्का बसला. 10 धावांची भर घालून धावबाद झाला. स्टार्कने सैनीच्या रुपात टीम इंडियाला 8 वा धक्का दिला आहे. बुमराह खातेही न खोलता रन आउट झाला. कमिन्सने मोहम्मद सिराजला 6 धावांवर बाद करत भारतीय संघाचा डाव 244 धावांतच आटोपला. रविंद्र जडेजा 28 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने 94 धावांची आघाडी घेतली असून आता ते टीम इंडियासमोर किती धावांचे लक्ष्य ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT