SA vs AUS Women's T20 World Cup Final sakal
क्रीडा

Women's T20 World Cup: 'चोकर्स' दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न भंगले! ऑस्ट्रेलियाचा टी-20 वर्ल्डकपचा 'षटकार'

Kiran Mahanavar

SA vs AUS Women's T20 World Cup Final : चोकर्स दक्षिण आफ्रिकेचे पुन्हा स्वप्न भंगले आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव करत सहाव्यांदा विजेतेपद पटकावले.

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया सर्वात यशस्वी संघ आहे. ऑस्ट्रेलियन संघाने या स्पर्धेत आतापर्यंत सहावेळा ट्रॉफीवर कब्जा केला. ऑस्ट्रेलियाही विजयाची हॅट्ट्रिक झाला आहे. लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने सहावी आणि सातवी आवृत्ती जिंकली आणि संघाला सलग तिसरा विजय नोंदवला आहे. या स्पर्धेची ही आठवी आवृत्ती आहे.

केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 156 धावा केल्या. पहिल्या विकेटसाठी बेथ मुनी आणि एलिसा हिली यांच्यात 36 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी मारिजाने कॅपने मोडली, ज्याने हिलीला 18 धावांवर बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर मूनीने गार्डनरसोबत झटपट धावा काढल्या. मात्र वेगवान फलंदाजी करणारा ऍश गार्डनर चोल ट्रायनच्या चेंडूवर 29 धावा करून आऊट झाली.

ऑस्ट्रेलियाच्या संघाचे एक टोक बेथ मुनीने हाताळले आणि वेगाने धावा काढल्या. तिने या सामन्यात तिचा सर्व अनुभव पणाला लावला आणि शेवटच्या षटकांमध्ये जोरदार फलंदाजी केली. बेथ मुनीने अंतिम सामन्यात 53 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 74 धावांची तुफानी खेळी केली. आफ्रिकन संघाकडून शबनिम इस्माईल आणि मारिजाने केपने 2-2 विकेट घेतल्या. याशिवाय मलाबा आणि ट्रायन यांना 1-1 असे यश मिळाले.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून 137 धावा करता आल्या. एल वोल्वार्डने 48 चेंडूत 61 धावा केल्या. 17व्या षटकात तो बाद होताच दक्षिण आफ्रिकेच्या आशाही संपुष्टात आल्या.

ऑस्ट्रेलियन संघ यापूर्वी 2010, 2012, 2014, 2018 आणि 2020 मध्ये चॅम्पियन बनला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्यांदा महिला टी-20 विश्वचषकात विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली आहे. यापूर्वी या संघाने 2010, 2012 आणि 2014 मध्ये सलग तीन वेळा विजेतेपद पटकावले होते. त्याच वेळी, आता 2018, 2020 आणि 2023 मध्ये विजेतेपद पटकावले आहेत. प्रथमच एखाद्या संघाने पुरुष किंवा महिला क्रिकेटसह ICC स्पर्धेत दुसऱ्यांदा विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Deshmukh Murder Case: कोण होते पंडित कमलाकर देशमुख, कशी झाली होती हत्या? सोलापूर हादरवणारी Exclusive माहिती

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

Credit Card Offer: लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड ऑफर! कमी क्रेडिट स्कोअर असला तरीही चालेल! काय आहे ही नवी ऑफर?

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात पाणीटंचाईचा कळस! रागावलेल्या ग्रामस्थांचा मनसेसोबत मटकाफोड आंदोलन

आजारी पत्नीवर जादूटोणा करण्याचा प्रकार उघड! 'शेतात चाललं होतं भयानक कांड'; संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना समोर..

SCROLL FOR NEXT