Australia vs West Indies marathi news sakal
क्रीडा

AUS vs WI 3rd ODI : ऑस्ट्रेलियाने भर दिवसा वेस्ट इंडिजला दाखवले तारे! अवघ्या 6.5 षटकात कांगारूं संघाने जिंकला सामना

Australia take just 6.5 overs to destroy woeful West Indies. Australia clinched the series against the West Indies, कॅनबेरा येथील तिसरा एकदिवसीय सामना आठ गडी राखून जिंकला.

Kiran Mahanavar

Australia vs West Indies : अगदी आठवडाभरापूर्वी वेस्ट इंडिज संघाने ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गाबाच्या मैदानात त्यांचा पराभव करत इतिहास रचला. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि 27 वर्षांनंतर तेथे कसोटी सामना जिंकला. यादरम्यान वेस्ट इंडिज संघाची बरीच चर्चा झाली.

पण आता टेबल फिरले आहेत. वेस्ट इंडिजला वनडे फॉरमॅटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार होता. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने गाबा येथे झालेल्या पराभवाची भरपाई केली. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-0 ने जिंकली आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना कॅनबेरा येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ऐतिहासिक विजय मिळवला.

कॅनबेरा वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ प्रथम फलंदाजीला आला. पण वेस्ट इंडिजचा संघ 100 धावाही करू शकला नाही आणि 25 व्या षटकात 86 धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियासाठी झेवियर बार्टलेट हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या सामन्यात त्याने 4 विकेट्स घेतल्या. त्याचवेळी ॲडम झाम्पा आणि लान्स मॉरिसने 2-2 विकेट घेतल्या.

यानंतर ऑस्ट्रेलियाने केवळ 6.5 षटकांत 87 धावांचे लक्ष्य गाठले. ज्याने एकदिवसीय इतिहासातील सर्वाधिक 259 चेंडू शिल्लक असताना हा सामना जिंकला. यापूर्वी सप्टेंबर 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाने 253 चेंडू शिल्लक असताना अमेरिकेचा पराभव केला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने केवळ 7.5 षटकांत 66 धावांचे लक्ष्य पार केले.

एकदिवसीय इतिहासात चेंडू शिल्लक असताना सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडने 1979 मध्ये 277 चेंडू शिल्लक असताना कॅनडाचा पराभव केला होता. या सामन्यात इंग्लंडने 13.5 षटकात 46 धावांचे लक्ष्य गाठले. पण हा एकदिवसीय सामना 60 षटकांचा होता. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाचा हा विजय वनडे इतिहासात चेंडू शिल्लक असताना सर्वात मोठ्या विजयाच्या बाबतीत 7 व्या क्रमांकावर आहे.

ODI मधील सर्वात मोठा विजय (बॉल बाकी असताना)

  • इंग्लंड विरुद्ध कॅनडा 277 चेंडू

  • श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे 274 चेंडू

  • श्रीलंका विरुद्ध कॅनडा 272 चेंडू

  • नेपाळ वि यूएसए 268 चेंडू

  • न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश 264 चेंडू

  • भारत विरुद्ध श्रीलंका 263 चेंडू

  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज 259 चेंडू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT