Australia announce preliminary squad for 2023 World Cup 
क्रीडा

Australia WC Squad: ODI वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा! मार्नस लबुशेनला डच्चू, डेव्हिड वॉर्नरच काय झालं?

Kiran Mahanavar

Australia announce preliminary squad for 2023 World Cup : ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा केली आहे. 18 सदस्यीय संघात मार्नस लबुशेनला स्थान न मिळाल्याने एकदिवसीय वर्ल्ड कप खेळण्याचे त्याचे स्वप्न भंगले आहे. त्याचवेळी डेव्हिड वॉर्नरला स्थान मिळाले आहे.

ऑस्‍ट्रेलियाचा संघ नुकताच भारत दौ-यावर आला होता, तेव्हा लबुशेन यांच्या संघाचा एक भाग होता. पण आता त्याला संघाबाहेर केले आहे. लबुशेनने भारताविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत केवळ 43 धावा केल्या होत्या.

मार्नस लॅबुशेनने ऑस्ट्रेलियासाठी 30 एकदिवसीय सामने खेळले असून, त्यात 31.37 च्या सरासरीने केवळ 847 धावा केल्या आहेत. लबुशेनच्या नावावर एकदिवसीय सामन्यांच्या 28 डावांमध्ये केवळ 1 शतक आणि 6 अर्धशतके आहेत. लबुशेनने 2020 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अशा स्थितीत त्याची ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली असती तर तो प्रथमच एकदिवसीय विश्वचषक खेळताना दिसला असता. पण त्याला संघातून वगळले आहे.

भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केवळ 18 सदस्यीय संघाचीच निवड केली नाही, तर त्याआधी दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेसाठीही निवड केली आहे.

ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेत 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे, त्यानंतर त्याला एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारताचा दौरा करायचा आहे. ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, जिथे तो 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

दक्षिण आफ्रिका दौरा, भारत दौरा आणि एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, अॅरॉन हार्डी, जोस हेझलवुड , जोस इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मार्कस स्टॉइनिस, अॅडम झाम्पा, ट्रॅव्हिस हेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT