AUS vs SA pat cummins  esakal
क्रीडा

AUS vs SA : ऑस्ट्रेलियाच्या देदीप्यमान इतिहासाला लागलं गालबोट; वर्ल्डकपच्या मध्यावरच नेतृत्व बदलण्याची येणार वेळ?

अनिरुद्ध संकपाळ

AUS vs SA Pat Cummins : वनडे क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त दबदबा कोणत्या देशाचा असेल तर तो ऑस्ट्रेलिया! समोर ऑस्ट्रेलियाचा संघ असल्यावर प्रतिस्पर्धी संघाला आज आपला चांगलाच घाम निघणार आहे याची पुरेपूर कल्पना असायची. तुम्हाला जर कांगारूंना हरवायचं आहे तर तुम्हाला त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्रिकेट खेळावं लागतं.

मात्र वर्ल्डकप 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन सामन्यात अशी काही कामगिरी केली आहे ती पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. स्टीव्ह वॉ आणि रिकी पाँटिंग यांच्या नेतृत्वातील ती ऑस्ट्रेलियाची टीम आता राहिली नाही हे सत्य असलं तरी कांगारू म्हणजे झुंजारपणा हे गणित अजूनही अबाधित होतं.

मात्र भारताविरूद्धच्या सामन्यात ज्या प्रकारे त्यांची बँटिंग कोसळली ते पाहता यंदाचा वर्ल्डकप हा त्यांच्यासाठी एक वाईट स्वप्न ठरणार असं दिसत होतं. हेजलवूडचा नवीन चेंडूवरील स्पेल सोडला तर कांगारू सुमारच दिसले.

त्यांचा सुमारपणा हा दक्षिण आफ्रिकेसमोर तर जास्तच अधोरेखित झाला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा पॅट कमिन्सचा निर्णय हा त्यांच्या चांगलाच अंगलट आला. आफ्रिकने 50 षटकात 311 धावा ठोकल्या.

कमिन्स, स्टार्क हेजलवूड स्टोयनिस यांच्यासारखे दमदार गोलंदाज असतानाही डिकॉक आणि बाऊमाने 108 धावांची सलामी दिली. विशेष म्हणजे उत्तम फिल्डिंग हा डीएनएच असलेले कांगारू या सामन्यात 'फाटक्या हाताचे' ठरले. त्यांनी तब्बल 4 झेल सोडले. त्याचा फायदा उचलत आफ्रिकेने 311 धावांचा डोंगर उभारला.

यानंतर खेळपट्टीवर दव पडेल या आशेवर फलंदाजी घेतलेल्या कांगारूंना दगाफटका झाला. खेळपट्टीवर दवबिंदू काही दिसले नाही मात्र कांंगारूंची सदोष फलंदाजीचं दर्शन मात्र झालं. त्यांचा निम्मा संघ अवघ्या 65 धावात गारद झाला.

कगिसो रबाडा, केशव महाराज, मार्को येनसेन यांनी कसलेली कांगारूंची बॅटिंग लाईन अप उडवून टाकली. 6 बाद 70 धावा अशी अवस्था झालेले कांगारू आफ्रिकेच्या तोफगोळ्यांचा मारा सहन करत शंभरी तरी गाठणार असा प्रश्न उपस्थित झाला होता.

मात्र मार्नस लाबुशेनने 46 धावांची उशिरा का होईना मात्र झुंजार खेळी करत ऑस्ट्रेलियाची लाज राखण्याचा प्रयत्न केला. टॉप आर्डरने संघ अडचणीत आणल्यानंतर तळातील फलंदाज मिचेल स्टार्क (21), पॅट कमिन्स (22) यांनी ऑस्ट्रेलियाला 150 पार पोहचवत लाज वाचवली. मात्र कांगारूंचा डाव 177 धावात संपवत दक्षिण आफ्रिकेने 134 धावांनी विजय मिळवला.

जरी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कमिन्सने फार मोठा पराभव थोडा छोटा करण्याचा प्रयत्न केला असला तरी पहिल्या दोन सामन्यांमधील वर्ल्डकप इतिहासातील दैदिप्यमान श्रीमंती मिरवणाऱ्या कांगारू गरिबी पाहता संघाच्या नेतृत्वात वर्ल्डकपच्या मध्यावर कमिन्सची कॅप्टन्सी गेल्यास आश्चर्य वाटू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT