Australia Open 2023 Hs Prannoy esakal
क्रीडा

Australia Open 2023 : प्रणॉयची एका तासाची झुंज अखेर वाया; वेंगने घेतला मलेशिया मास्टर्सचा घेतला बदला

अनिरुद्ध संकपाळ

Australia Open 2023 Hs Prannoy : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयला आज (दि. 6) ऑस्ट्रेलिया ओपन सुपप 500 च्या फायनलमध्ये पराभवाचा धक्का बसला. त्याला चीनच्या वेंग होंगने तीन गेमच्या रोमहर्षक सामन्यात पराभूत केले. प्रणॉयला या वर्षातील दुसरी BWF 500 स्पर्धा जिंकण्याची संधी होती. वर्ल्ड रँकिंगमध्ये 24 व्या स्थानावर असलेल्या वेंगकडून त्याचा 9-21, 23-21, 20-22 असा पराभव झाला.

केरळच्या 31 वर्षाच्या प्रणॉयने ऑस्ट्रेलिया ओपन 2023 बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये पहिला गेम 21 - 9 अशा मोठ्या फरकाने जिंकला होता. मात्र दुसऱ्या गेममध्ये वेंगने कडवी झुंज दिली, प्रणॉयने देखील जोरदार पुनरागमन केलं. मात्र अखेर गेम वेंगने 23 - 21 असा जिंकला.

तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये प्रणॉय आघाडीवर होता. मात्र वेंगने जोरदार पुनरागमन करत गेम 20 - 20 असा बरोबरीत आणला. त्यानंतर वेंगने दोन गुण घेत गेम 23 - 20 अशा जिंकला.

वेंगने घेतला बदला

प्रणॉय आणि वेंग यांच्यामध्ये यापूर्वी फक्त एकच सामना झाला होता. या सामन्यात प्रणॉयने तीन गेममध्ये वेंगचा पराभव केला होता. प्रणॉयने मलेशिया मास्टर्स जिंकले होते. मात्र ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये वेंगने प्रणॉयने केलेल्या पराभवाची परतफेड केली. आता या दोन खेळाडूंमधील स्पर्धा 1 - 1 अशी बरोबरीत आहे.

प्रणॉयने भारताच्यात प्रियांशू राजावतचा 21 - 18, 21 - 12 असा दोन गेममध्ये पराभव करत ऑस्ट्रेलिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. प्रणॉय म्हणाला की, मी बदलाचा स्विकार केला आणि नवनवीन गोष्टी शिकण्यावर भर दिला, त्यासाठी मी तयार होते. माझ्या सोबत जी टीम काम करत आहे ती खूप चांगली आहे. ते सरावावेळी प्रत्येक दिवशी माझी मदत करत असतात.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Dairy Scheme : गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना भरभरून देतय, शेतमजूर, अल्पभूधारकांना आणली आता नवी योजना, काय आहे फायद्याची स्कीम

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

SCROLL FOR NEXT