Australia opener Travis Head Diagnosed With Finger Fracture Likely to Miss World Cup 2023 
क्रीडा

ODI World Cup : वर्ल्डकपच्या 20 दिवस आधी संघाला मोठा धक्का! सलामीवीरला झाली गंभीर दुखापत, टूर्नामेंटमधून जाणार बाहेर?

Kiran Mahanavar

ODI World Cup 2023 : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 अगदी जवळ आला असून त्यासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. आयसीसीची ही मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला एक प्रबळ दावेदार मानले जात आहे.

परंतु यादरम्यान ऑस्ट्रेलियाचे अनेक प्रमुख खेळाडू जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये खूप वाढ झाली आहे. स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन हे दुखापतग्रस्त असून आता या यादीत स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडचेही नाव जोडले गेले आहे.

ट्रॅव्हिस हेडलाही वर्ल्ड कपपूर्वी दुखापत झाली आहे. त्याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. खरंतर, सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीचा एक चेंडू ट्रॅव्हिस हेडच्या डाव्या हाताला लागला. यानंतर हेडला खूप त्रास झाल्याचे दिसले, त्यावेळी ऑस्ट्रेलियन वैद्यकीय पथकाने त्याच्यावर उपचार केले, परंतु दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन तो निवृत्त झाला आणि पुन्हा फलंदाजीला आला नाही.

ट्रॅव्हिस हेडच्या दुखापतीबद्दल सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणाले की, हे फ्रॅक्चर आहे, परंतु दुखापत किती गंभीर आहे, हे उद्या कळले. आतापर्यंत फ्रॅक्चरची पुष्टी झाली आहे आणि उद्या दुसर्‍या स्कॅननंतर पुढील विचार केला जाईल. वर्ल्ड कप येत असल्याने आम्हाला आशा आहे की सर्वकाही ठीक होईल.

हेड आगामी वर्ल्ड कपसाठी उपलब्ध नसल्यास ऑस्ट्रेलियन संघात मार्नस लॅबुशेन किंवा टिम डेव्हिड यांचा समावेश केला जाऊ शकतो.

वर्ल्ड कप 2023 साठी ऑस्ट्रेलिया संघ -

पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

SCROLL FOR NEXT