Australia South Africa Tour India In September BCCI announce esakal
क्रीडा

Paytm Home Series: सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका - ऑस्ट्रेलिया करणार भारत दौरा

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका भारताचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले. बीसीसीआयने या दोन दौऱ्याचे वेळापत्रकर प्रसिद्ध केले असून सप्टेंबर महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20 मालिका होणार आहे. त्यानंतर लगचेच दक्षि आफ्रिका तीन सामन्यांची टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतात येईल. या मालिका ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपपूर्वी होणार आहेत. त्यामुळे संघाचा वर्ल्डकपपूर्वी चांगला सराव होणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (Australia Tour Of India)

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ तीन टी 20 सामने खेळणार आहे. पहिला टी 20 सामना 20 सप्टेंबरला मोहालीत होणार असून दौऱ्यातील दुसरा टी 20 सामना हा 23 सप्टेंबरला नागपूरमध्ये होणार आहे. या दौऱ्यातील शेवटचा आणि तिसरा टी 20 सामना रविवारी 25 सप्टेंबरला हैदराबाद येथे होईल.

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा (South Africa Tour Of India)

ऑस्ट्रेलियाने भारताचा दौरा केल्यानंतर लगेचच तीन दिवसात दक्षिण आफ्रिका भारतासोबत तीन टी 20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी 20 मालिकेतील पहिला टी 20 सामना 28 सप्टेंबरला तिरूवअनंतपुरम येथे खेळवला जाईल. तर दुसरा टी 20 सामना 2 ऑक्टोबरला गुवाहाटीत तर तिसरा टी 20 सामना 4 ऑक्टोबरला इंदौरमध्ये होईल.

दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका देखील होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबरला लखनौमध्ये तर दुसरा सामना 9 ऑक्टोबरला रांचीत होईल. 11 ऑक्टोबरला दिल्लीत तिसरा वनडे सामना खेळवत मालिकेची सांगता करण्यात येणार आहे. त्यानंतर 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्डकप सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT