australia hockey 
क्रीडा

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका बरोबरीत

वृत्तसंस्था

व्हिक्‍टोरिया (ऑस्ट्रेलिया) - भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची हॉकी मालिका जिंकण्यात अपयश आले. उत्तरार्धात जेझ हेवॉर्डने केलेल्या दोन गोलने ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना बुधवारी २-३ अशा पिछाडीवरून ४-३ असा जिंकला. त्यामुळे दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. 

निमंत्रित हॉकी स्पर्धेतील ब्राँझपदक आणि कसोटी मालिकेतील बरोबरी यामुळे भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलिया दौरा फलदायीच ठरला. दुसऱ्या सामन्यातही भारतीयांचा खेळ उल्लेखनीय झाला. कर्णधार रघुनाथने भारताच्या विजयासाठी झोकून दिले; पण अखेरीस त्याचे प्रयत्न अपयशी ठरले. पूर्वार्धातील पहिले सत्र वेगवान ठरले. सहाव्याच मिनिटाला आकाशदीपने जाळीचा वेध घेत भारताला आघाडीवर नेले; पण १३व्या मिनिटाला ट्रेंट मिटॉन याने मैदानी गोल करून ऑस्ट्रेलियाला बरोबरीवर आणले.

पूर्वार्धातील दुसरे सत्र वेगवान म्हणण्यापेक्षा अधिक दडपणाखाली खेळले गेले. दोन्ही संघ आक्रमण आणि प्रतिआक्रमणात व्यग्र राहिले. त्यामुळे दोन मिनिटांत दोन गोल बघायला मिळाले. प्रथम २२व्या मिनिटाला रघुनाथने कॉर्नर सत्कारणी लावत भारताला आघाडीवर नेले. पुढच्याच मिनिटाला जेक व्हेटीने ऑस्ट्रेलियाला पुन्हा बरोबरीवर आणले. या गोलनंतर पुन्हा एकदा भारताचे प्रतिआक्रमण सरस ठरले. सामन्याच्या २५व्या मिनिटाला रघुनाथने आणखी एक कॉर्नर सत्कारणी लावताना भारताला ३-२ असे आघाडीवर नेले. 

विश्रांतीच्या आघाडीनंतर उत्तरार्धात भारतीय खेळाडू सातत्य राखू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारतीय खेळाडू अधिक थकलेले वाटले. याचा फायदा यजमानांनी उठवला. तिसऱ्या सत्रात सामन्याच्या ३८व्या मिनिटाला हेवर्डने ऑस्ट्रेलियाला पुन्हा बरोबरीवर आणले आणि ५१व्या मिनिटाला आणखी एक गोल करून ऑस्ट्रेलियाला सामन्यात प्रथमच आघाडी मिळवून दिली. त्यानंतर यजमानांनी बचाव भक्कम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बैठक, कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरवर होणार निर्णायक चर्चा ?

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातवर चौदावा गुन्हा दाखल; सिन्नर पोलिसांकडून तपास सुरू

नीलेश लंकेंनी न्यायालयीन लढाईसुद्धा जिंकली, सुजय विखे पाटलांना दणका

Pimpri News : हक्काच्या घराचे स्वप्न उद्योगनगरीत पूर्ण; ‘पीएमआरडीए’मुळे एक हजार कुटुंबांना घरकुल

Beed News: इकडे आड, तिकडे विहीर; अनेक रस्त्यांवर ब्लॅकस्पॉट; विहिरी ठरतात अपघातांचे कारण

SCROLL FOR NEXT