Australia v Pakistan Boxing Day Test day three sakal
क्रीडा

Aus vs Pak 1st Test : ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात ३१८ धावांपर्यंत मजल तर पाकिस्तानची हालत खराब

सकाळ ऑनलाईन टीम

Australia v Pakistan Boxing Day Test : यजमान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला पहिल्या दिवसअखेरीस सुस्थितीत असतानाही पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांचा डाव ३१८ धावांवरच आटोपला. त्यानंतर अब्दुल्ला शफीक व शान मसूद यांनी अर्धशतकी खेळी करीत पाकला भक्कम सुरुवात करून दिली; पण पॅट कमिन्स व जॉश हॅझलवूड या वेगवान गोलंदाजांनी पाकच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवत त्यांची अवस्था दुसऱ्या दिवसअखेरीस ६ बाद १९४ धावा अशी केली. आता पाकिस्तानचा संघ १२४ धावांनी पिछाडीवर आहे.

ऑस्ट्रेलियाने ३ बाद १८७ या धावसंख्येवरून बुधवारी पुढे खेळायला सुरुवात केली. मार्नस लाबुशेन याने ६३ धावांची खेळी केली. तसेच मिचेल मार्शने ४१ धावा केल्या; पण दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानकडून आमेर जमाल याने ६४ धावांच्या मोबदल्यात मार्नस लाबुशेन, स्टीवन स्मिथ व पॅट कमिन्स यांना बाद केले. शाहीन शाह आफ्रिदी, मिर हामझा व हसन अली यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

अर्धशतकी खेळींनंतर निराशा

अब्दुल्ला शफीक व इमाम उल हक या सलामीवीरांनी ३४ धावांची भागीदारी करताना आश्‍वासक सुरुवात करून दिली; पण नॅथन लायनच्या गोलंदाजीवर इमाम १० धावांवर बाद झाला. त्यानंतर अब्दुल्ला व शान मसूद यांनी अनुक्रमे ६२ धावांची व ५४ धावांची खेळी साकारताना पाकिस्तानसाठी मोलाची कामगिरी बजावली.

पॅट कमिन्सने अब्दुल्लाला बाद करीत पाकला दुसरा धक्का दिला. यानंतर मात्र पाकच्या फलंदाजांना चमक दाखवता आली नाही. २ बाद १२४ या धावसंख्येवरून पाकची अवस्था ६ बाद १७० धावा अशी झाली. अब्दुल्लाने आपल्या खेळीत पाच चौकार मारले. मसूद याने ३ चौकार व एक षटकारासह ५४ धावांची खेळी केली. लायनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. बाबर आझम, सौद शकील, आगा सलमान अपयशी ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्वारीच्या कोठारात यंदा हरभरा-करडईची पेरणी! अतिवृष्टीमुळे मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना ५७० कोटींचा फटका; ऑक्टोबर उजाडला तरी नाही 'मालदंडी'ची पेरणी

Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीला जाताय? तर चुकूनही विसरू नका 'या' 2 गोष्टी, नाहीतर स्वतःचं नुकसान करून घ्याल..!

आजचे राशिभविष्य - 07 ऑक्टोबर 2025

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT