Australia vs India 2nd Test  
क्रीडा

IND vs AUS - 2nd Test, Day 1 - पहिल्या दिवशी कमालीचा योगायोग!

सकाळ ऑनलाईन टीम

Australia vs India  2nd Test Day 1  Live :  भारतीय गोलंदाजांनी दमदार सुरुवात करुन दिल्यानंतर भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात स्टार्कने मयांकला माघारी धाडले. त्याला खातेही उघडता आले नाही. डावाच्या सुरुवातीलाच पहिली विकेट पडल्यानंतर पुजारा मैदानात आला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिली कसोटी खेळणारा शुभमन गील 28(38) आणि चेतेश्वर पुजाराने 7 (23) धावांवर खेळत होते. मागील शनिवारी भारतीय संघ 36 धावांत आटोपला होता. योगायोगाने या शनिवारी पहिल्या दिवसाअखेर भारताच्या धावफलकावर 1 बाद 36 धावा पाहायला मिळाल्या. 

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-० अशी आघाडी घेतली असून ही आघाडी मजबूत करण्याच्या इराद्याने पहिल्या सामन्यातील कॉम्बिनेशनसह ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरला आहे.


पहिल्या कसोटी भारतीय संघाला नामुष्कीजनक पराभवाला सामोर जावं लागलं होतं. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत मात्र भारतीय गोलंदांनी दमदार कामगिरी केली असून पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 डावात संपवला. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, फिरकीपटू आर अश्विन आणि सिराज यांच्या माऱ्यासमोर कांगारुंचा डावा एका दिवसातच गुंडाळला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅब्युशेन आणि ट्रेविस हेड हे दोघे वगळता इतर फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. लॅब्युशेनने सर्वाधिक 48 तर ट्रेविस हेडने 38 धावांची खेळी केली. तर भारताकडून बुमराहने 4 , अश्विनने 3 आणि सिराजने 2 तर जडेजाने एक गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाचा डाव संपल्यानंतर भारताचे सलामीवीर फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. 

तत्पूर्वी, भारताकडून जसप्रीत बुमराहने गोलंदाजीला सुरूवात करून जो बर्न्स याला शुन्यावरच बाद केले. त्यानंतर फॉर्मात असलेल्या  मॅथ्यू वेडला अश्विनने  बाद करत ३५ धावांतच ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर तंबूत पाठवले. लबुशेनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. तसेच स्टीव्ह स्मिथला आज भोपळाही फोडता आला नाही.

भारताकडून बुमराह आणि अश्विन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले आहेत. तर आजच कसोटी पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजलाही आपला पहिला बळी मिळवण्यात यश आले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ५ गडी  गमावून १४६ धावांवर खेळत होता. त्यानंतर पुढच्या 50 धावात शेवटचे 5 गडी बाद झाले.

चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 65 धावा 

पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांसमोर आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. सलामीवीर बर्न्सला बुमराहने खातेही उघडू दिले नाही. त्याच्यानंतर अश्विनने आपल्या फिरकीतील कमाल दाखवून देत दोन विकेट घेतल्या. त्याने सलामीवीर मॅथ्यू वेडला 30 धावांवर चालते केले. रविचंद्रन अश्विनने त्याचा अप्रतिम झेल टिपला. याशिवाय स्मिथच्या रुपात अश्विनने संघाला मोठे यश मिळवून दिले. स्मिथला 8 चेंडू खेळूनही खाते उघडता आले नाही. उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने 3 बाद 65 धावा केल्या होत्या. लाबुशेन 26 (68) ट्रॅविस हेड 4 (37) धावांवर खेळत होते. 
 

38-3 : स्मिथला अश्विनने खातेही उघडू दिले नाही, पुजाराने स्लिपमध्ये घेतला अप्रतिम झेल

35-2 : मॅथ्यू वेडच्या खेळीला अश्विनने लावला ब्रेक, त्याने 30 धावा केल्या
 

 10-1 : बुमराहनं टीम इंडियाला मिळवून दिलं पहिलं यश, बर्न्स 10 चेंडू खेळून खातेही न उघडता फिरला माघारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

Mohol News : अठरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने वसतीगृहातच गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT