Australia vs Namibia  Sakal
क्रीडा

Australia vs Namibia : ऑस्ट्रेलियाला ‘सुपर आठ’ फेरीचा ध्यास; ब गटातील लढतीत आज नामिबियाशी लढणार

ओमान संघावर विजय मिळवणाऱ्या नामिबिया संघाला आपले आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नॉर्थ साऊंड (अँटीग्वा) ­­: तीन वर्षांपूर्वी टी-२० विश्‍वकरंडकाचे जेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियन संघ यंदाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उद्या (ता. ११) नामिबिया संघाचा सामना करणार आहे. ओमान व इंग्लंडवर विजय मिळवल्यानंतर आता बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघ ब गटातील सलग तिसऱ्या लढतीत बाजी मारून ‘सुपर आठ’ फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.

ओमान संघावर विजय मिळवणाऱ्या नामिबिया संघाला आपले आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागणार आहे. कागदावर तरी या लढतीत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

ऑस्ट्रेलियाने सलामीच्या लढतीत ओमान संघावर ३९ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर गतविजेत्या इंग्लंडला ३६ धावांनी धूळ चारली. आता नामिबियावर मात केल्यास ऑस्ट्रेलियाचा ‘सुपर आठ’ फेरीतील प्रवेश पक्का होईल.

अखेरच्या साखळी फेरीत त्यांना स्कॉटलंडचा सामना करावा लागणार आहे. या गटातून स्कॉटलंडने पाच, तर ऑस्ट्रेलियाने चार गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे या दोन्ही संघांना आगेकूच करण्याची संधी असणार आहे.

डेव्हिड वॉर्नर व ट्रॅव्हिस हेड ही ऑस्ट्रेलियन सलामी जोडी दमदार फलंदाजी करीत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत दोघांनी केलेल्या झंझावाती फलंदाजीमुळेच ऑस्ट्रेलियाला विजयाची भक्कम पायाभरणी करता आली. ऑस्ट्रेलियन संघात अष्टपैलू खेळाडूंची कमी नाही.

ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क हे सर्व खेळाडू गोलंदाजी तसेच फलंदाजी करू शकतात. त्यामुळे इतर संघांपेक्षा या संघाकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याचा फायदा त्यांना घेता येऊ शकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT