Australia Women vs India Women 1st Match Group A Live Commonwealth Games Womens Cricket Competition 2022 esakal
क्रीडा

CWG2022 INDW vs AUSW : पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव

अनिरुद्ध संकपाळ

Birmingham Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या महिला क्रिकेट टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन विकेट्सनी पराभव केला. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 155 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 7 फलंदाजांच्या मोबदल्यात 19 षटकात पार केले. ऑस्ट्रेलियाकडून अॅश्लेघ गार्डनेरने नाबाद 52 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तिला 20 चेंडूत 37 धावा करून ग्रेस हॅरिसने चांगली साथ दिली. भारताकडून रेणुका सिंहने 4 तर दिप्ती शर्माने 2 विकेट घेत चांगली झुंज दिली.

पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने १५७ धावा करत पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे.

AUSW 91/5 (12) : ग्रेस हॅरिसने डाव सावरला

ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 बाद 49 धावा झाली असताना ग्रेस हॅरिसने अॅश्लेघ गार्डनेरच्या साथीने संघाला 12 षटकात 91 धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र मेघना सिंहने 20 चेंडूत 37 धावांची खेळी करणाऱ्या ग्रेस हॅरिसला बाद करत ही जोडी फोडली.

49-5 : ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी

दिप्ती शर्माने रिचेल हायनेसला 8 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वीच पाचवा धक्का दिला.

34-4 : रेणुका सिंहचा भेदक मारा

भारताने ठेवलेल्या 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. भारताच्या रेणुका सिंहने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर उडवली. तिने अॅलिसा हेले (0), मेघ लेनिंग(8), बेथ मूनी (10), ताहलिया मॅग्राथ(14) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

154-8 (20 Ov) : भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 155 धावांचे आव्हान

हरमनप्रीत कौरच्या 52 आणि शेफाली वर्माच्या 48 धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 155 धावांचे आव्हान ठेवले.

154-7 : दमदार अर्धशतक ठोकणारी कर्णधार बाद

हरमप्रीतने कॅप्टन्स इनिंग खेळत भारताला 150 धावांचे टप्पा पार करून दिला. मात्र तिला स्कुटने 52 धावांवर बाद केले.

140-6 : हरलीन देओल 6 धावा करून बाद 

हरलीन देओलला जोनासेनने 6 धावांवर बाद करत भारताला सहावा धक्का दिला.

 117-5 : जोनासेनचा भेदक मारा 

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फलंदाजीला जेस जोनासेनने मोठे भगदाड पाडले. तिने जेमिमाह रॉड्रिग्ज (11) आणि दिप्ती शर्माला (1) एकाच षटकात बाद करत भारताचा निम्मा संघ 117 धावात पॅव्हेलियनमध्ये धाडला.

93-3 : शेफाली वर्माचे अर्धशतक हुकले

ऑस्ट्रेलियाच्या जेस जोनासेनने भारताला मोठा धक्का दिला. तिने अर्धशतकाच्या जवळ पोहचलेल्या शेफाली वर्माला 48 धावांवर बाद केले. शेफालीने 33 चेंडूत 9 चौकारांच्या सहाय्याने 48 धावा केल्या होत्या.

68-2 : यस्तिका भाटिया बाद; भारताला दुसरा धक्का

भारताला 68 धावांवर दुसरा धक्का बसला. यस्तिका भाटिया 8 धावांवर धावबाद झाली.

भारताची आश्वासक सुरूवात; शेफालीची आक्रमक फलंदाजी 

सलामीवीर शेफाली वर्माने आक्रमक फलंदाजी करत भारताला 9 षटकात 1 बाद 68 धावांपर्यंत मजल मारून दिली.

25-1 : भारताला पहिला धक्का 

डार्सी ब्राऊनने 17 चेंडूत 24 धावा करणाऱ्या स्मृती मानधनाला केले बाद

भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women’s World Cup 2025 Ind vs Pak : आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, महिला खेळाडू हस्तांदोलन करणार?

MPSC 2025: खुल्या प्रवर्गाने परीक्षा द्यायची नाही का? ‘राज्य कर निरीक्षक’ पदासाठी शून्य जागा; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT