Australia Women vs India Women
Australia Women vs India Women  
क्रीडा

AUSW vs INDW नो बॉलमुळं भारतीय संघानं सामन्यासह मालिका गमावली!

सुशांत जाधव

Australia Women vs India Women 2nd ODI : ऑस्ट्रेलियन महिला संघाची बॅटर बेथ मूनीच्या (Beth Mooney) शतकी खेळी अन् तिला कॅरीन दिलेली साथ याच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिला संघाने सामन्यासह वनडे मालिका खिशात घातली. अखेरच्या चेंडूवर तीन धावांची गरज असताना झुलन गोस्वामीने कॅरीला झेलबा केले. पण थर्ड अंपायरने हा चेंडू नो बॉल दिल्यामुळे ऑस्ट्रेलियाला आणखी एक संधी मिळाली. शेवटच्या चेंडूवर आवश्यक असणाऱ्या 2 धावा करत कॅरीने संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियन महिला संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियन महिलांनी टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला होता. भारताची सलामीची बॅटर स्मृती मानधनाचे अर्धशतक 86 (94) आणि रिचा घोष 44 (50) धावांच्या जोरावर भारतीय महिला संघाने निर्धारित 20 षटकात 7 बाद 274 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन महिला संघाने 5 विकेट्स राखून विजय नोंदवला. कॅरीने 38 चेंडूत 39 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला बेथ मूनी 133 चेंडूत 125 धावांवर नाबाद राहिली. तिची शतकी खेळी कॅरीने सार्थ ठरवली.

भारतीय महिला संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन महिला संघाची सुरुवात खराब झाली. भारताची जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामी हिने पहिल्याच षटकात एलिसा हेलीच्या रुपात भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. मेग लेनिंग 6 (21), एलिस पेरी 2(7) आणि गार्डनर 24 चेंडूत 12 धावा करुन परतल्यानंतर तहिला मेग्रानं बेथ मूनीला उत्तम साथ दिली. या दोघींनी पाचव्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली. मेग्रानं 77 चेंडूत 74 धावा केल्या. भारतीय महिला संघाकडून झुलन गोस्वामी, मेघना सिंग, पूजा वस्त्राकर आणि दीप्तीने एक-एक विकेट घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT