Hockey India vs Australia sakal
क्रीडा

Hockey India vs Australia: भारतीय हॉकी संघावर व्हाईटवॉशची नामुष्की ; ऑस्ट्रेलियाचा अखेरच्या लढतीत ३-२ ने विजय

भारतीय पुरुष हॉकी संघावर व्हाईटवॉशची नामुष्की ओढवली. यजमान ऑस्ट्रेलियन हॉकी संघाने येथे झालेल्या अखेरच्या लढतीत भारतीय संघावर ३-२ असा विजय नोंदवला. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत ५-० असे घवघवीत यश संपादन केले.

सकाळ वृत्तसेवा

पर्थ : भारतीय पुरुष हॉकी संघावर व्हाईटवॉशची नामुष्की ओढवली. यजमान ऑस्ट्रेलियन हॉकी संघाने येथे झालेल्या अखेरच्या लढतीत भारतीय संघावर ३-२ असा विजय नोंदवला. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत ५-० असे घवघवीत यश संपादन केले.

भारताने पाचव्या लढतीत चौथ्या मिनिटालाच आघाडी घेतली. हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्याचा हा या मालिकेतील तिसरा गोल ठरला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये बरोबरी साधली. जेरेमी हायवर्ड याने २० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने दोन गोल करताना भारतावरील दबाव वाढवला. के. वाय. विलियट याने ३८ व्या मिनिटाला व टीम ब्रँडने ३९ व्या मिनिटाला गोल करीत ऑस्ट्रेलियाला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. भारतासाठी दुसरा गोल बॉबी सिंग धामी याने केला. त्याने ५३ व्या मिनिटाला गोल केला, पण त्यानंतर भारतीय संघाला गोल करता आला नाही

पाच लढतींमधील कामगिरी

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पाच सामन्यांची मालिका एकतर्फी झाली. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना ५-१ असा मोठ्या फरकाने जिंकला. दुसऱ्या सामन्यातही त्यांनी ४-२ असे भारताचे आव्हान परतवून लावले. भारतीय संघाकडून तिसऱ्या लढतीत कडवी झुंज देण्यात आली. तरीही ऑस्ट्रेलियाने २-१ असा विजय मिळवला. कांगारुंनी चौथ्या लढतीत ३-१ असे यश संपादन केले. अखेरची लढत ३-२ अशी जिंकताना ऑस्ट्रेलियाने वर्चस्व प्रस्थापित केले.

जेरेमीचे सर्वाधिक गोल

ऑस्ट्रेलियाच्या जेरेमी हायवर्ड याने पाच सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक गोल केले. त्याने पाच सामने खेळताना सात गोल केले. यापैकी सहा गोल त्याने पेनल्टी कॉर्नरवर, तर एक गोल पेनल्टी स्ट्रोकवर केला. भारताच्या हरमनप्रीत सिंगने तीन गोल केले. ऑस्ट्रेलियाच्या टॉम विकहॅम, व टीम ब्रँड यांनी प्रत्येकी दोन गोल केले. तसेच भारताच्या जुगराज सिंग यानेही दोन गोल केले.

पॅरिस ऑलिंपिकची तयारी

पॅरिस ऑलिंपिकच्या तयारीकडे लक्ष ठेवून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाने पाचही सामन्यांत विजय मिळवून आपण सज्ज झालो आहोत याची झलक दाखवली, पण भारतीय संघाला प्रत्येक बाबींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आगामी काळात भारतीय संघाला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT