Australia World Cup 2023 Mitchell Starc Wife Alyssa Healy 
क्रीडा

World Cup 2023 : वर्ल्ड कपदरम्यान ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूसाठी वाईट बातमी! पत्नीला चावला कुत्रा अन्...

Kiran Mahanavar

Australia World Cup 2023 Mitchell Starc Wife Alyssa Healy : 2023 च्या वर्ल्ड कपदरम्यान ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मिचेल स्टार्कसाठी वाईट बातमी आली आहे. झालं असं की, त्याची पत्नी एलिसा हिली हिला कुत्रा चावला आहे.

एलिसाची मैत्रिण आणि ऑस्ट्रेलियन संघाची महिला क्रिकेटर फोबी लिचफिल्ड हिने याला दुजोरा दिला. कुत्रा चावल्यामुळे एलिसाला महिला बिग बॅश लीगचा एकही सामना खेळता आला नाही. ती सिडनी थंडरविरुद्धच्या सामन्यातून बाहेर राहिली.

फॉक्स स्पोर्ट्सवरील एलिसाबद्दल बोलताना फोबी लिचफिल्ड म्हणाली की, "तिला कुत्रा चावला आहे. ही गोष्ट सर्वांना माहीत आहे का हे मला नाही माहीत. मला आशा आहे की ती बरी होईल.

अॅलिसा हीली ही ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज मिचेल स्टार्कची पत्नी आहे. 2015 मध्ये त्यांनी लग्न केले. एलिसाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने ऑस्ट्रेलियासाठी 6 टी-20 आणि 2 एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकले आहेत. सध्या ती महिला बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळत आहे.

मिचेल स्टार्क सध्या भारतात वर्ल्ड कप खेळत आहे. आजून पण मिचेलला काही विशेष कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंत त्याला 4 सामन्यात गोलंदाजी करताना केवळ 6 विकेट घेता आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT