Australian Open 2021, Novak Djokovic,Daniil Medvedev  
क्रीडा

Australian Open 2021 Men's Final: ओन्ली जोकोविच! मेदवेदेवचं स्वप्न पुन्हा उद्धवस्त

सकाळ ऑनलाईन टीम

मेलबर्न : सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि रशियन डेनियल मेदवेदेव यांच्यात रविवारी वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमसाठी लढत रंगली होती. जागतिक क्रमावरीतील अव्वलस्थानी असलेल्या जोकोविचने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या मेदवेदेवला पराभूत करत नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. या जेतेपदासह जोकोविचने 18 व्या ग्रँडस्लमवर नाव कोरले.  जोकोविचनं 7-5, 6-2, 6-2 अशा फरकाने  मेदवेदेव याला पराभूत केले.

मेलबर्न पार्कच्या कोर्टवर रंगलेल्या सामन्यात जोकोविचने सुरुवातीपासून वर्चस्व राखले. जोकोविचने पुन्हा एकदा डॅनियल मेदवेदेवचे कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅमचे स्वप्न उद्धवस्त केले. पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये रोजर फेडरर आणि राफेल नडाल यांचा समावेश आहे. दोघांनी प्रत्येकी 20-20 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे.

त्यानंतर जोकोविच तिसऱ्या स्थानावर आहे. यापूर्वी मेदवेदेव याला अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये जोकोविचनेच पराभूत केले होते. जोकोविच आणि मेदवेदेव  आतापर्यंत 8 वेळा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. यात जोकोविचने 5 तर मदवेदेव याने 3 सामने जिंकले आहेत. भारत भारत भारत भारत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिलीपासून हिंदी भाषा! त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल मुदतीपूर्वी? अहवालात नेमकं काय?

``थ्रू ए डिप्लोमॅट्स लेन्स’’

Pakistani Terrorist: मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवादी लपून बसलेत; भारतीय लष्कराची शोधमोहीम सुरू, पण कुठे?

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा जुना फोटो काँग्रेस नेत्याने केला व्हायरल; शपथविधी सोहळा अन् जमिनीवर बसलेले मोदी

SCROLL FOR NEXT