Australian Open 2022 Sakal
क्रीडा

Australian Open 2022 : विजेत्याला Prize Money किती मिळणार माहितीये?

सुशांत जाधव

Australian Open 2022 Prize Money : वर्षातील पहिली वहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन 17 जानेवारीपासून सुरु होतेय. टेनिस जगतातील अव्वल नोवाक जोकोविचमुळे स्पर्धा आधीच चर्चेत राहिली आहे. कोरोनाची लस न घेतल्यानंत ऑस्ट्रेलिय सरकारने त्याचा व्हिसा रद्द केला आणि त्याचा या स्पर्धेत खेळण्याचा मार्ग बंद झाला. परिणामी त्याचे विश्वविक्रमी ग्रँडस्लमच स्वप्न लांबणीवर पडले आहे. पुरुष गटात आता नदालला विश्वविक्रमाची संधी आहे. मेदवेदेव हा त्याला तगडी फाईट देऊ शकतो.

ऑस्ट्रेलियन ओपन या मानाच्या आणि प्रतिष्ठित टेनिस स्पर्धेत बक्षीसांची मोठी खैरातच असते. मागील वर्षी कोरोनाच्या संकटातही आयोजकांनी खेळाडूंना बक्षीस रुपात मोठी रक्कम देऊ केली होती. जाणून घेऊयात या स्पर्धेत कोणत्या गटातील विजेत्याला किती बक्षीस मिळते यावर एक नजर.....

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या पुरुष आणि महिला एकेरीत चॅम्पियन खेळाडूला 2.3 मिलियन डॉलर (17.10 कोटी रुपये) बक्षीस मिळेल. महिला गटात ऑस्ट्रेलियाची एश्ले बार्टी पहिल्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी कोर्टात उतरेल. सध्याच्या घडीला ती महिला रँकिंगमध्ये अव्वलस्थानी आहे.

महिला आणि पुरुष एकेरीतील बक्षीस?

विजेता - 17.10 कोटी रुपये

उपविजेता - 12.20 कोटी रुपये

सेमी-फायनलिस्ट – 5.95 कोटी रुपये

क्वार्टर फायनलिस्ट– 3.24 कोटी रुपये

राउंड 4 - 1.61 कोटी रुपये

राउंड 3 - 97.45 लाख रुपये

राउंड 2 - 75.78 लाख रुपये

राउंड 1 - 47.9 48.72 लाख रुपये

पुरुष आणि महिला दुहेरी बक्षीस

विजेता - 4.33 कोटी रुपये

उपविजेता - 2.16 कोटी रुपये

सेमी-फायनलिस्ट – 1.07 कोटी रुपये

क्वार्टर फायनलिस्ट – 59.51 लाख रुपये

राउंड 3 - 33.56 लाख रुपये

राउंड 2 - 21.56 लाख रुपये

राउंड 1 - 13.52 लाख रुपये

मिश्र दुहेरी बक्षीस

विजेता - 1.02 कोटी रुपये

उपविजेता - 54.11 लाख रुपये

सेमी-फायनलिस्ट– 27.05 लाख रुपये

क्वार्टर-फायनलिस्ट - 13.02 लाख रुपये

राउंड 2 - 6.51 लाख रुपये

राउंड 1 - 1.62 लाख रुपये

मागील वर्षी 2021 च्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील एकेरीतील विजेत्याला 2 मिलियन अमेरिकी डॉलर (14.87 कोटी रुपये) मिळाले होते. फ्रेंच ओपेन विजेत्याला 11.88 कोटी विम्बल्डन ओपन विजेत्याला 17.29 कोटी आणि अमेरिकन ओपनच्या विजेत्याला 18.53 कोटीचे बक्षीस मिळाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT