Naomi Osaka Australian Open 2024  esakal
क्रीडा

Australian Open 2024 : नाओमी ओसाका तब्बल 15 महिन्यांनी परतली मात्र पहिल्याच फेरीत बसला धक्का

दोन वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी ओसाका पहिल्याच फेरीत झाली गारद

अनिरुद्ध संकपाळ

Australian Open 2024 Naomi Osaka : महिला टेनिसमध्ये नाओमी ओसाका तसं मोठं नाव आहे. मात्र तब्बल 15 महिन्यांच्या ब्रेकनंतर कोर्टवर परतलेल्या नाओमी ओसाकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर जम बसवण्यास थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियन ओपन 2024 च्या पहिल्याच फेरीत ओसाकाचा पराभव झाला असून तिचे धडाक्यात पुनरागमन करण्याचे स्वप्न स्वप्नच राहिलं आहे. विशेष म्हणजे नाओमी ओसाकाने यापूर्वी दोनवेळा ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

नोओमी आसोका ही नुकतीच आई झाली. ती जवळपास 15 महिने टेनिस कोर्टपासून दूर होती. ऑस्ट्रेलियन ओपनद्वारे तिने ग्रँडस्लॅमच्या कोर्टवर पुनरागमन करण्याचं ठरवलं. मात्र कॅरोलिन गार्सियाने पहिल्याच फेरीत तिचा 4-6, 6-7(2-7) असा पराभव केला.

ओसाकाच्या खेळात लवचिकपणा जाणवत नव्हता. याचा फायदा कॅरोलिनाने उचलला. फ्रेंच खेळाडूने ओसाकाला पहिल्या सेटमध्ये पुनरागमनाची एकही संधी न देता तो 4 - 6 असा जिंकला. कॅरोलिनाने पहिला सेट 41 मिनिटात जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये अनुभवी ओसाकाने जोरदार प्रतिकार केला. कॅरोलिनाला आपली सर्व्ह ब्रेक करण्याची संधी दिली नाही. मात्र ओसाकाला संपूर्ण सामन्यात ब्रेक पॉईंट मिळवता आला नाही. दुसरा सेटही टाय ब्रेकवर गेला. कॅरोलिनाने शांत चित्ताने खेळ करत टाय ब्रेकर जिंकला. कॅरोलिनाने आजच्या सामन्यात ओसाकाच्या तुलनेत फार कमी चुका केल्या. तिने संपूर्ण सामन्यात 13 एस सर्व्ह केल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT