PV Sindhu Fear Corona ESAKAL
क्रीडा

Australian Open : अपयशाच्या फेऱ्यातून सिंधू बाहेर येणार?

ऑस्ट्रेलियन ओपन आजपासून; श्रीकांतसाठीही महत्त्वाची स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा

सिडनी : प्रत्येक स्पर्धेत नवी आशा आणि नव्या अपेक्षांनी सुरुवात करणाऱ्या पी. व्ही. सिंधूच्या पदरी निराशाच येत आहे. आता उद्यापासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेत तरी नशीब पालटणार का, हा प्रश्न सिंधूसमोर आहे. किदांबी श्रीकांतही प्रगती करणाऱ्या कामगिरीसाठी प्रयत्नशील असेल.

चार लाख २० हजार डॉलर बक्षीस रकमेची ही स्पर्धा सुपर ५०० गुणांची आहे. डेन्मार्कमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी फॉर्म मिळवण्यासाठी सिंधू आणि श्रीकांसमोर ही ऑस्ट्रेलियन स्पर्धा अखेरची संधी असणार आहे.

दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या सिंधूची यंदाच्या मोसमात मोठी पिछेहाट सुरू आहे. यंदाच्या १२ बीडब्ल्यूएफ जागतिक स्पर्धांपैकी सात स्पर्धांत तिचे आव्हान पहिल्या एक-दोन फेऱ्यांतच संपुष्टात आले आहे. या मोसमात सिंधूच्या वाटचालीत अनेक बदल झाले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून सोबत असलेल्या कोरियाच्या पार्क ताय सँग या प्रशिक्षकांबरोबर तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर तिने साईचे प्रशिक्षक विधी चौधरी यांचे सहकार्य घेतले. आता २००३ मधील ऑल इंग्लंड विजेते मुहम्मद हफिझ हाशिम हे तिचे प्रशिक्षक आहेत, तरी अपयशाच्या फेऱ्यांतून सिंधूला मार्ग काढता आलेला नाही.

प्रत्येक आठवड्यात स्पर्धा होत असल्याने कमकुवत झालेल्या कच्च्या दुव्यांवर तिला मार्गही शोधता आलेला नाही. हाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. उद्या होणाऱ्या सलामीच्या सामन्यात सिंधूचा सामना अस्मिता छालिहाविरुद्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

SCROLL FOR NEXT