Auto Driver Son Mukesh Kumar IPL 2023  esakal
क्रीडा

Mukesh Kumar : रिक्षा चालकाच्या मुलाला लागली आयपीएलची बंपर लॉटरी; 5.50 कोटीमध्ये झाला दिल्लीकर

अनिरुद्ध संकपाळ

Auto Driver Son Mukesh Kumar IPL 2023 : आयपीएल 2023 मिनी ऑक्शनमध्ये रिक्षा चालकाच्या मुलाचे नशिब उघडले आहे. बिहारच्या गोपालगंजमध्ये राहणाऱ्या मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी कोलकाता गाठलेल्या मुकेश कुमारवर तब्बल 5.50 कोटी रूपयांची बोली लागली. मुकेशचे वडील रिक्षा चालवत होते. मात्र दुर्दैवाने गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले.

मुळचा बिहारचा असलेल्या मुकेश कुमारचे आयुष्य खूप संघर्षमय होते. मात्र क्रिकेटच्या वेडाने त्याचे आयुष्यच बदलले. विशेष म्हणजे तो आयपीएल खेळण्यापूर्वीच भारतीय संघात निवडला गेला होता. आता आयपीएलमध्येही त्याला छप्पर फाड के बोली लागली. दिल्ली कॅपिटल्सने त्याला 5.50 कोटी रूपयाला खरेदी केले. मुकेशची बेस प्राईस 20 लाख होती. त्याला आपल्या बेस प्राईसच्या 28 पटीने जास्त रक्कम मिळाली आहे.

सैन्यात जाणार होता मुकेश

मुकेशला भारतीय आर्मीत जायचं होतं. त्याने यासाठी तीनवेळा प्रयत्न देखील केले. मात्र त्याच्या नशिबात क्रिकेट खेळून देशाची सेवा करणे होते. गरीबीत वाढलेला मुकेश त्याच्या 6 भावंडांसोबत राहत होते. त्याचे वडील कोलकात्यात रिक्षा चालवत होते. नंतर त्यांनी मुकेशलाही कोलकात्यात नोकरीसाठी बोलवून घेतलें. मात्र कोलकात्यात मुकेशचे मन क्रिकेटमध्ये रमले.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT