South Africa vs India 2nd Test Avesh Khan marathi news  
क्रीडा

SA vs IND 2nd Test | सेंच्युरियनमधील पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या ताफ्यात घातक गोलंदाजाची एन्ट्री

Kiran Mahanavar

South Africa vs India 2nd Test Avesh Khan | भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे, जिथे टीम इंडिया टी-20 आणि एकदिवसीय मालिका संपवून कसोटी मालिका खेळत आहे.

या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियन मैदानावर खेळला गेला, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला. आता टीम इंडियाला मालिका गमवायची नसेल तर त्यांना केपटाऊनमध्ये होणारा दुसरा कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल.

पण त्याआधी मोठी बातमी येत आहे, सेंच्युरियनमधील पराभवानंतर भारतीय संघात वेगवान गोलंदाज आवेश खानचा समावेश करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोहम्मद शमीच्या जागी आवेश खानची निवड केली आहे. आवेश खान आधीच टीम इंडियासोबत आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळला.

वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात आवेश खानने मॅच विनरची भूमिका बजावली होती. त्याने 27 धावांत चार विकेट घेतल्यामुळे यजमान संघ 27.3 षटकांत 116 धावांवर गारद झाला. भारताने अवघ्या 17 षटकांत हे लक्ष्य गाठले. त्याने अद्याप कसोटीत पदार्पण केले नाही. भारतासाठी 8 एकदिवसीय सामन्यात 9 आणि 19 टी-20 सामन्यात 18 बळी घेतले आहेत.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची घोषणा करताना बीसीसीआयने शमीला कसोटी संघात स्थान दिले होते. मात्र, मोहम्मद शमीचे कसोटी मालिकेत खेळणे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असल्याचेही निवेदनात म्हटले होते.

बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने शमीला फिटनेस प्रमाणपत्र दिले नाही, त्यामुळे तो या मालिकेतून बाहेर पडला. सेंच्युरियन कसोटीतील पराभवानंतर अनेक दिग्गजांनी भारतीय संघाला शमीची उणीव भासल्याचे वक्तव्य केले होते.

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध्द कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT