Avesh Khan breaks Rassie van der Dussen's bat into two pieces esakal
क्रीडा

बाकीच्या बॉलर्सची पिटाई होत होती अन् आवेशच्या यॉर्करने बॅटचे केले दोन तुकडे

पहिल्या टी २० सामन्यात टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाज आवेश खानने दक्षिण अफ्रिकेला भरला दम

धनश्री ओतारी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) यांच्यात पहिला टी २० सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारतावर ७ विकेट्सनी विजय मिळवला. मात्र, पहिल्याच सामन्यात भारताचा खतरनाक यॉर्कर पाहायला मिळाला. आवेश खानच्या खतरनाक यॉर्करने डुसेनच्या बॅटचे दोन तुकडे केले आहेत. ज्याच्या व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान १४ व्या षटकादरम्यान भारताकडून वेगवान गोलंदाज आवेश हे षटक टाकण्यासाठी आला होता. तर दक्षिण आफ्रिकेकडून डूसेन स्ट्राईकवर होता. या षटकातील तिसरा चेंडू आवेशने यॉर्कर टाकला, ज्यावर डूसेनने कव्हरच्या दिशेला फटका मारला. आवेशने फेकलाल हा यॉर्कर इतका भेदक होता की, डूसेनची बॅट मधून चिरली.

या क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी डूसेन २२ धावांवर खेळत होता. बॅटचे २ तुकडे झाल्याने नवीन बॅट मागवण्यात आली.

डूसेन ४६ चेंडूत नाबाद ७५ धावा करत संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. डूसेनबरोबरच डेविड मिलरनेही संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारताविरुद्ध भारतात टी२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकी फलंदाजांनी केलेली सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. या अभेद्य भागीदारीच्या जोरावरच पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने हा सामना जिंकला आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर २११ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हे आवाहन आफ्रिकेने 5 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह आफ्रिकेने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीच्या यादीत मोठा घोळ; व्यापारी बँकांकडून जादा व्याज आकारणीचा संशय, ५.५ लाख खाती ऑडिटच्या कक्षेत

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

SCROLL FOR NEXT