IND vs ENG ESAKAL
क्रीडा

IND vs ENG : अक्षरची चूक भारताला महागात पडणार? पोपचा शतकी धमाका अन् सामना गेला चौथ्या दिवसावर

अनिरुद्ध संकपाळ

India Vs England 1st Test Day 3 : इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज ऑली पोपने अक्षर पटेलने दिलेल्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलत दुसऱ्या डावात नाबाद 148 धावांची खेळी केली. या 148 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर आपल्या दुसऱ्या डावात 6 बाद 316 धावा केल्या.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 436 धावात संपुष्टात आला. रविंद्र जडेजा 87 धावांवर करत अक्षर पटेल हा 44 धावा करून बाद झाला. जडेजाचे शतक तर अक्षरचे अर्धशतक हुकले.

पहिल्या डावात भारताने 190 धावांची आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात झुंजार फलंदाजी केली. झॅक क्राऊली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी रचली.

अखेर ही जोडी अश्विनने फोडली. क्राऊली 31 धावांवर बाद झाला. त्यानंतर डकेटने आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडला 113 धावांपर्यंत पोहचवले. मात्र बुमराहने 47 धावांवर डकेटचा त्रिफळा उडवला. पाठोपाठ जो रूटला देखील 2 धावांवर माघारी धाडलं.

दुसऱ्या बाजूने ऑली पोपने आपली विकेट टिवकून ठेवली होती. मात्र बेअरस्टोने 10 धावा करत त्याची साथ सोडली. दरम्यान पोपने आपले अर्दशतक पूर्ण केलं अन् संघाला 150 धावांच्या जवळ पोहचवले.

दरम्यान, बेअरस्टो बाद झाल्यानंतर आलेला कर्णधार बेन स्टोक्स देखील 6 धावा करून बाद झाला. त्यानंतर बेन फोक्स आणि ऑली पोप यांनी सहाव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी रचली. रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर अक्षरने झेल सोडलेल्या पोपने शतकी खेळी करत भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवले.

पोप दिवसअखेर नाबाद राहिला. त्याने रेहान अहमदसोबत भागीदारी रचत इंग्लंडला दिवसअखेर 316 धावांपर्यंत पोहचवले. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1 विकेट मिळवली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT