Rohit Sharma on Ashwin sakal
क्रीडा

Rohit Sharma on Ashwin: 'एक अष्टपैलू म्हणून अश्विन...' अक्षर पटेलची दूखापत अन् कर्णधार रोहित शर्माने दिले संकेत

Kiran Mahanavar

Rohit Sharma on R Ashwin : टीम इंडियाने रविवारी कोलंबोमध्ये झालेल्या आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करून आशिया कपचे विजेतेपद पटकावले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या खतरनाक स्पेलनंतर शुभमन गिल आणि इशान किशन यांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने पाच वर्षांनंतर आशिया कप जिंकला. दरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माने अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनबाबत मोठे वक्तव्य केले.

आशिया कप विजेतेपद पटकावल्यानंतर पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित म्हणाला की, अश्विन एक फिरकीपटू अष्टपैलू म्हणूनही या योजनेत आहे. मी त्याच्याशी फोनवर बोलत आहे. अक्षर शेवटच्या क्षणी दूखापत झाली होती. त्यावेळी वॉशिंग्टन उपलब्ध होता, म्हणून त्याला बोलाण्यात आले. आशियाई गेमच्या सराव शिबिराचा भाग असल्याने सुंदर हा सामना खेळण्यासाठी लगेचच फिट झाला. मी खेळाडूंच्या भूमिकेबाबत अगदी स्पष्ट आहे.

अश्विनने शेवटचा वनडे सामना जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. विजेतेपद जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत रोहितने स्टार अष्टपैलू अक्षर पटेल आणि फलंदाज श्रेयस अय्यर यांच्या आरोग्य आणि फिटनेसबद्दल सांगितले. रोहित म्हणाला की, डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे, तर मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर 99 टक्के मॅच फिट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT