Ayhika-Sutirtha esakal
क्रीडा

भारताच्या अहिका-सुतिर्थाने रचला इतिहास; Asian Table Tennis Championships स्पर्धेत जिंकले पहिले दुहेरी पदक

Ayhika-Sutirtha : भारताच्या अव्वल मानांकित अहिका-सुतिर्थाच्या जोडीने आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतासाठी पहिले दुहेरी पदक जिंकले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Asian Table Tennis Championships: कझाकस्तानमधील अस्ताना येथे झालेल्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत अहिका मुखर्जी आणि सुतिर्था मुखर्जी या भारताच्या अव्वल मानांकित महिला दुहेरी जोडीने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत त्यांनी भारतासाठी पहिले महिला दुहेरी कांस्यपदक जिंकले आहे. अहिका आणि सुतिर्था यांची जोडी या स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला दुहेरी जोडी बनली आहे.

जागतिक महिला दुहेरी क्रमवारीत १५व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीने उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या किम न्योंग आणि ली युन्हे यांचा पराभव करून उपांत्यफेरीत प्रवेश केला. परंतु उपांत्यफेरीत जागतिक जपानच्या मिवा हारिमोटो आणि मियु किहारा या जागतिक क्रमवारीत ३३व्या क्रमांकाच्या जोडीने ३-० (४-११, ९-११, ९-११) ने पराभूत केले. त्यामुळे भारतीय जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

मुखर्जीं जोडीने मागच्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांमध्ये भारताला पहिले पदक (कांस्यपदक) मिळवून देले होते. तर, जागतिक टेबल टेनिस (WTT)स्पर्धेमध्येही या जोडीने महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकून पहिली भारतीय जोडी होण्याचा मान मिळवला.

पुरुष गटात, अचंता शरथ कमल, मानव ठक्कर आणि हरमीत देसाई यांच्या संघला उपांत्य फेरीत चायनीज संघाकडून ०-३ ने पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे पुरूष संघालाही कांस्यपदकावर सामाधान मानावे लागले. त्यांचे या स्पर्धेत हे सलग तिसरे पदक आहे.

भारताने आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत तीन कांस्यपदके जिंकली आहेत. भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कांस्यपदकासह विजयाची सुरूवात केली. भारताने आत्तापर्यंत या स्पर्धेत ८ कांस्यपदके जिंकली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विद्यानंद बापटांपूर्वी नारायण पेठेतील ‘PIL मॅन’ DJ विरोधात लढला होता! सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेला लढा

पाकडे जगासमोर उघडे! Imam-Ul-Haq वर दोन वर्षांच्या बंदीची तलवार, तर मोहम्मद रिझवानची कारकीर्द संकटात; नेमका काय केलाय कांड?

Mumbai News: मुंबईच्या मतदार यादीचे 'क्लिनिंग'! तीस लाखांहून अधिक नावे वगळली, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

Marathi News Live Updates : प्रॉपर्टी डीलरची गोळ्या झाडून हत्या

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात 22 कॅरेट, 18 कॅरेट अन् 24 कॅरेट सोनं कितीला मिळतंय?

SCROLL FOR NEXT