Baba Indrajith Vijay hazare trophy esakal
क्रीडा

Baba Indrajith Vijay hazare trophy: ओठ फाटला तरी बाबा इंद्रजीत लढला! संघाचा पराभव तरी मन जिंकलं

अनिरुद्ध संकपाळ

Baba Indrajith Vijay hazare trophy : क्रिकेटचा सामना म्हटलं की एक संघ जिंकणार एक संघ हरणार. जिंकलेल्या संघाची चर्चा होते तर हरलेल्या संघाची समिक्षा केली जाते. मात्र काही सामने असे असतात जिथे जिंकणाऱ्यांपेक्षा पराभव झालेल्यांचीच चर्चा जास्त होते.

विजय हजारे ट्रॉफीमधील हरियाणा विरूद्ध तमिळनाडू यांच्यातील हा सामना देखील असाच आहे. तमिळनाडू जरी हरला असला तरी संघातील झुंजार खेळाडू बाबा इंद्रजीतमुळं हा सामना कायम चर्चेत राहील.

हरियाणाने तमिळनाडूचा 63 धावांनी पराभव करत पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीची फायनल गाठली. जरी सामना हरियाणाने जिंकला असला तरी बाबा इंद्रजीतच्या त्या 64 धावा सर्वांच्याच मनात घर करून गेल्या. सामन्यादरम्यान, बाबा इंद्रजीतचा ओठ फाटला.

मात्र त्यानंतरही त्याने सामना न सोडता ओठ बँड एड पट्टीने बांधून ठेवला अन् फलंदाजी केली. बाबाचा हा फोटो पाहून अनिल कुंबळेची आठवण झाली. त्याने देखील 2002 च्या अँटिगा कसोटीत जबडा तुटला असतानाही जबडा पट्टीने बांधून गोलंदाजी केली होती.

बाबा इंद्रजीत ज्यावेळी फलंदाजी करण्यासाठी आला त्यावेळी तमिळनाडूची अवस्था 2 बाद 54 धावा अशी झाली होती. त्यानंतर इंद्रजीतने संघाला 192 धावांपर्यंत पोहचवलं. अखेर सातव्या विकेटच्या रूपात बाबा इंद्रजीत बाद झाला अन् तमिळनाडूचा पराभव निश्चित झाला.

हरियाणाने पहिल्यादा फलंदाजी करताना 7 बाद 293 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या तमिळनाडूचा संपूर्ण संघ 230 धावात बाद झाला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT