Babar Azam Pakistan Vs England 1st Test ESAKAL
क्रीडा

Babar Azam : तब्बल 1768 धावा! बाबर आझमने पाकिस्तानच्या पराभवाचे कोणावर फोडले खापर?

अनिरुद्ध संकपाळ

Babar Azam Pakistan Vs England 1st Test : पाकिस्तानने इंग्लंडविरूद्धची कसोटी 75 धावांनी गमावली. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1 - 0 अशी आघाडी घेतली. इंग्लंडने कसोटीच्या पहिल्याच दिवशी 506 धावा केल्यानंतर रावळपिंडीच्या खेळपट्टीवर सपाटून टीका करण्यात येत आहे. आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने देखील पीसीबीला चिमटा काढत विकेटवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. पहिल्या कसोटीत पाच दिवसात दोन्ही संघांनी तब्बल 1768 धावा केल्या.

दरम्यान, बाबर आझमने पराभवानंतर सामना कुठे गमवाला याचे कारण पत्रकार परिषदेत सांगितले. ज्या पद्धतीने आम्ही रणनिती आखली होती त्या प्रकारे खेळपट्टी तयार करण्यात आली नव्हती. त्यामुळे पाकिस्तानची रणनिती फेल गेली असे त्याने सांगितले.

पत्रकारांशी बोलताना पराभवाबद्दल बाबर म्हणाला की, 'आमच्याकडे खेळपट्टीबाबत चांगली माहिती होती. आम्ही जी आखणी केली होती. ज्या गोष्टी होतील अशी अपेक्षा केली होती. तशी खेळपट्टी आम्हाला मिळाली नाही. दुर्दैवाने आमचे प्लॅन्स योग्यरित्या मैदानावर उतरलेच नाहीत. आम्हाला थोडी फिरकीला साथ देणारी खेळपट्टी हवी होती. तो आमचा प्लॅन होता. मात्र दुर्दैवाने हवामानामुळे किंवा तयारी करण्यातील चुकीमुळे हवीतशी खेळपट्टी तयार झाली नाही.'

इंग्लंडने पहिल्या डावात 657 धावा केल्या. तर दुसरा डाव 7 बाद 264 धावांवर घोषित केला. दरम्यान, पाकिस्तानने देखील पहिल्या डावात दमदार फंलदाजी केली. त्यांनी 579 धावा केल्या. मात्र इंग्लंडने विजयासाठी 342 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर त्यांचा दुसरा डाव 268 धावांमध्ये संपुष्टात आला. पहिल्या कसोटीत तब्बल 7 फलंदाजांनी शतक ठोकले.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT