babar azam mohammad rizwan sakal
क्रीडा

Babar-Virat : बाबर आझमने पुन्हा विराट कोहलीला टाकले मागे, रिझवानसोबत रचला इतिहास

बाबर आझमचे शानदार शतक, पाकिस्तानचा इंग्लंडवर विक्रमी विजय

Kiran Mahanavar

Babar Azam Virat Kohli : पाकिस्तानने त्यांच्याच घरच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला. यासह सात सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. या सामन्यात कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने जोरदार फटकेबाजी केली. इंग्लंडने या सामन्यात 200 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 19.3 षटकात एकही विकेट न गमावता 203 धावा करत सामना जिंकला. यासह बाबर आणि रिझवानने विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

धावाचा पाठलाग करताना बाबर आणि रिझवान यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठी सलामीची भागीदारी केली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रथमच सलामीच्या जोडीने 200 किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य ठेवले आहे. बाबर-रिजवानने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि मार्टिन गप्टिल यांचा विक्रम मोडला आहे. या दोन्ही किवी सलामीवीरांनी 171 धावांची नाबाद सलामी दिली होती.

इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात बाबर आझमने 66 चेंडूत नाबाद 110 धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हे त्याचे दुसरे शतक होते. यासोबतच बाबरने टी-20 फॉरमॅटमध्ये आपल्या 8 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह बाबरने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकले. बाबरने 218 डावात 8 हजार धावा पूर्ण केल्या. तर त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण करण्यासाठी 243 डाव खेळणाऱ्या कोहलीला मागे टाकले आहे. तर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल सर्वात जलद 8000 टी-20 धावा करण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे ज्याने 213 डावांमध्ये ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

आता CIBIL Score वाढवण्यासाठी ChatGPT मदत करणार, पण कशी? जाणून घ्या...

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

विकासासाठी शांतता हवी, मणिपूरमधील संघटनांना पंतप्रधान मोदींचं आवाहन; राज्यातील परिस्थितीवरही बोलले

Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील १.२६ कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना मिळणार आर्थिक लाभ; मुख्यमंत्री यादव यांची घोषणा

SCROLL FOR NEXT