Babar Azam Mohammad rizwan Video
Babar Azam Mohammad rizwan Video  sakal
क्रीडा

VIDEO: गजब बेइज्जती है यार! रिझवानचे मैदानात असे कृत्य पाहूण बाबर आझम म्हणाला - 'कर्णधार मी...'

Kiran Mahanavar

Babar Azam Mohammad rizwan Video Pakistan vs Sri lanka : आशिया चषक 2022 हंगामाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने आपले स्थान निश्चित केले आहे, जिथे त्याचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. पण याआधी सुपर-4 टप्प्यातील पाकिस्तानचा शेवटचा सामनाही श्रीलंकेविरुद्धच खेळल्या गेला. शुक्रवारी झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने 5 गडी राखून विजय मिळवला. अंतिम सामन्यापूर्वी श्रीलंकेसाठी हा मोठा विजय होता. सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने अशी प्रतिक्रिया दिली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मोहम्मद रिजवान आणि बाबर आझम यांच्यात मैदानावर असे काही घडले, ज्यानंतर बाबर आझमला सांगावे लागले 'मी कर्णधार' आहे.

श्रीलंकेच्या डावाच्या 16व्या षटकात वेगवान गोलंदाज हसन अली गोलंदाजी करत होता. त्याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कर्णधार दासून शनाकाने स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू यष्टीरक्षक रिझवानच्या हातात गेला. इकडे रिझवानला वाटले की बॅटला बॉल लागला आहे. रिझवानने अपील केले, पण मैदानी पंच अनिल चौधरी यांनी नाबाद घोषित केले. यानंतर कर्णधार बाबर आझमचा सल्ला न घेता रिझवानने रिव्ह्यू घेतला.

मोहम्मद रिझवानच्या सांगण्यावरूनच पंचांनी रिव्ह्यू घेतला. मोहम्मद रिजवानच्या या कृतीवर बाबर आझम मैदानावर मीच कर्णधार आहे असे म्हणताना दिसला. मात्र बाबरने नंतर डीआरएस घेण्याचे मान्य केले. मात्र संघाने हा रिव्ह्यू गमावला आणि शनाका नाबाद राहिला.

श्रीलंकेने पाकिस्तानचे 122 धावांचे आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात 17 व्या षटकात पार केले. श्रीलंकेने आशिया कपच्या सुपर 4 मधील आपले सर्व सामने जिंकून 6 गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. श्रीलंकेकडून सलामीवीर पथूम निसंकाने नाबाद 55 धावांची खेळी केली. तर त्याला कर्णधार शानकाने 21 आणि राजपक्षेने 24 धावांची खेळी करत चांगली साथ दिले. पाकिस्तानकडून हारिस रौऊफ आणि मोहम्मद हसनैने प्रत्येकी 2 विकेट घेत लंकेचे टेन्शन वाढवले होते.

तत्पूर्वी, आशिया कपच्या फायनलची रंगीत तालीम म्हणून समजल्या जाणाऱ्या सुपर 4 सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानला 121 धावात रोखले. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने 4 षटकात 21 धावा देत 3 तर महीश तिक्षाणाने देखील 4 षटकात 21 धावाच देत 2 विकेट घेतल्या. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 30 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT