Babar Azam sakal
क्रीडा

Babar Azam : 'मी नैसर्गिक खेळ खेळायला सांगितलं होत मात्र...' पराभवानंतर बाबरची पहिली प्रतिक्रिया

बाबर आझमचे टी-20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले

Kiran Mahanavar

Babar Azam T20 World Cup 2022 : इंग्लंडने फायनलमध्ये पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करत टी-20 वर्ल्ड कप 2022 चे विजेतेपद पटकावले. या विजेतेपदासह इंग्लंड संघाने इतिहास रचला आहे. इंग्लंड संघ दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक चॅम्पियन बनला आहे. मात्र, या सामन्यात पाकिस्तान संघाने इंग्लंडला कडवी झुंज देत सामना संपेपर्यंत जल्लोष कायम ठेवला. त्याचवेळी या जेतेपदाच्या लढतीतील पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचे टी-20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. सामन्यानंतर त्याने पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात कुठे चुकला हे सांगितले.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर म्हणातो, सर्व प्रथम इंग्लंड संघाचे अभिनंदन, त्यांनी शानदार लढत दिली. आम्हाला प्रत्येक मैदानावर खूप पाठिंबा मिळाला, इथे घरी असल्यासारखे वाटले त्यामुळे आपल्या सहकार्याबद्दल आभार. मी मुलांना त्यांचा नैसर्गिक खेळ खेळायला सांगितलं होत. पण आम्ही 20 धावा कमी केल्या, आमची गोलंदाजी जगातील सर्वोत्तम आक्रमणांपैकी एक आहे. दुर्दैवाने शाहीनच्या दुखापतीने आम्हाला सामन्यात रोखले, पण हा खेळाचा भाग आहे.

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव करून दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. पाकिस्तानला 8 बाद 137 धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडने 19 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 42 चेंडूत 45 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT