Babar Azam Shopping In India esakal
क्रीडा

Babar Azam Shopping In India : बाबर आझमने साडी निवडताना घेतला DRS; घरी फोन केला अन्...

अनिरुद्ध संकपाळ

Babar Azam Shopping In India : बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाचं वर्ल्डकपमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. मोठा चमत्कार अन् इंग्लंडची अविश्वसनीयरित्या खराब कामगिरीच पाकिस्तानला सेमी फायनलपर्यंत पोहचवू शकते.

पाकिस्तान संघ नुकतेच कोलकात्यात आपला लीग स्टेजमधील अन् बहुदा यंदाच्या वर्ल्डकपमधील शेवटचा सामना खेळण्यासाठी कोलकात्यात दाखल झाला आहे.

दरम्यान, इंग्लंडविरूद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कोलकात्यात शॉपिंगचा आनंद लुटला. मात्र ज्यावेळी साडी घेण्याची वेळ आली त्यावेळी त्याला DRS घेणे भाग पडले.

बाबर आझमने कोलकात्यातील मॉलमधून तब्बल सात साड्या खरेदी केल्या. मात्र या खरेदीवेळी बाबर आझमनेही इतर पुरूषांप्रमाणे साडी फायनल करण्यापूर्वी घरी फोन केला. त्यानंतरच त्याने साडी फायनल केली. सात साड्या निवडण्यासाठी तो बराचवेळ व्हिडिओ कॉलवर घरच्यांशी बोलत होता.

यावेळी त्याच्यासोबत संघ सहकारी इमाम उल हक देखील होता. या दोघांनी कोलकात्याच्या साऊथ सिटी मॉलमध्ये जवळपास दोन तास घालवले. त्यांचा बराच वेळ हा मॉलमधील 'सोच' स्टोअरमध्ये गेला.

इतर पुरूषांप्रमाणेच बाबर आझमला देखील साडी निवडण्यात अडचण येत होती. त्यामुळे त्याला घरच्यांचा आधार घ्यावा लागला. बाबर आझम आणि इमाम उल हकने मॉलमधील इतर स्टोअरमध्ये देखील खरेदी केली. बाबर आझम कोलकात्यात शॉपिंग करताना एकदम रिलॅक्स मूडमध्ये होता.

बाबर आणि इमाम हे कोलकात्यातील मॉलमध्ये अनेक तास घालवत असले तरी ते सुरक्षेच्या गराड्यात होते. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी क्रिकेट चाहत्यांना बाबर आणि इमामची स्वाक्षरी आणि फोटो काढण्यापासून रोखले.

मॉलमधील व्यवस्थापकाने सांगितले की या दोघांची सुरक्षा सामन्य नव्हती. त्यांच्या सुरक्षेची बरीच काळजी घेण्यात आली होती. पोलिसांनी पाकिस्तानी खेळाडूंना सुरक्षेच्या कारणास्तव चाहत्यांशी न बोलण्याचा सल्ला दिला होता.

मॉलमधील अधिकाऱ्यांना 15 मिनिटे आधी हे दोन पाकिस्तानी खेळाडू येणार असल्याची सूचना देण्यात आली. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की विदेशी खेळाडूंचे शेड्युल आणि ठिकाण ही माहिती खूप संवेदनशील असते. त्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT