Babar Azam Lanka Premier League
Babar Azam Lanka Premier League esakal
क्रीडा

Babar Azam : हे इस्लाम विरोधी... बाबर आझमनं लंका प्रीमियर लीगबाबत घेतला मोठा निर्णय

अनिरुद्ध संकपाळ

Babar Azam Lanka Premier League : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने लंका प्रीमियर लीगच्या तोंडावर एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने ज्या कंपन्या बेटिंगला प्रोत्साहन देतात त्यांचा लोगो असलेले किट परिधान करण्यास साफ नकार दिला आहे. बेटिंग हे इस्लाम विरोधी मानलं जातं.

त्यामुळे बाबर आझमने कोलंबो स्ट्राईकर्सशी करार करताना त्यामध्ये नो बेटिंग अँड अशी अट टाकली आहे. यापूर्वी पाकिस्तान संघातील मोहम्मद रिझवानने बेटिंग संबंधीच्या ब्रँड्सची जाहिरात करण्यास नकार दिला होता.

मिळालेल्या माहितीनुसार बाबर आझमने फ्रेंचायजीला कळवले आहे की तो बेटिंग ब्रँड्सच्या कोणत्याही प्रमोशनमध्ये सहभागी होणार नाही. विशेष म्हणजे बेटिंग कंपन्या या पाकिस्तान क्रिकेट लीगमधील संघाच्या स्पॉन्सर आहेत.

पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली की, 'पाकिस्तानचे बहुतांश खेळाडू हे फ्रेंचायजी मालक आणि लीग आयोजकांना सांगतात की ते बेटिंग करणाऱ्या कंपन्यांचा लोगो असलेले कपडे परिधान करणार नाहीत किंवा त्याची जाहिरात करणार नाही.'

काही पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी पीसीबी आणि पीएसएल फ्रेंचायजींच्या स्पॉन्सर्स विरूद्ध देखील भुमिका घेतात. पीसीबीचा पीएसएलमधील एक प्रमुख प्रायोजक ही बेटिंग वेबसाईट आहे.

पाकिस्तानमध्ये बेटिंग बेकायदेशीर आहे. त्यामुळे ही वेबसाईट दुसऱ्या एका उत्पादनाचा आधार घेऊन जाहिरात करते. मात्र बाबर आझमचा या गोष्टीला देखील विरोध आहे. त्याने कोलंबो स्ट्राईकर्सला स्पष्ट शब्दात विरोध केला आहे.

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम लंका प्रीमियर लीग 2023 मध्ये कोलंबो स्ट्राईकरचे नेतृत्व करणार आहे. ही स्पर्धा जुलै 30 पासून सुरू होणार आहे. याचा अंतिम सामना हा 22 ऑगस्ट रोजी होईल. बाबर आझम सोबतच नसीम शाह, वहाब रियाझ, मोहम्मद नवाझ, इफ्तिकार अहमद हे कोलंबो स्ट्राईकर्सच्या संघात आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT