babar azam tweet goes viral after sexting 
क्रीडा

Babar Azam: Sexting च्या आरोपानंतर बाबरचे ट्विट व्हायरल; म्हणाला...

सकाळ ऑनलाईन टीम

Babar Azam Leaked Video : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सोमवारी संध्याकाळपासूनच ट्विटरवर ट्रेंड करत आहे. बाबरचे काही वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून एका मुलीने त्याच्यावर सेक्सटिंगचा आरोप केला आहे. ही मुलगी दूसरी कोणी नसून पाकिस्तान संघातील खेळाडूंच्या गर्लफ्रेंड आहेत.

पाकिस्तान संघाला अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेत 0-3 असा क्लीन स्वीपचा सामना करावा लागला, त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेत 0-0 अशी बरोबरी झाली. पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील एकदिवसीय मालिकेत 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला. या सर्व प्रकारानंतर बाबरच्या कर्णधारपदावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. या सगळ्यात आणखी एक वाद चव्हाट्यावर आला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर बाबरने मौन पाळले आहे, मात्र त्यांनी आपला फोटो शेअर करत एक ट्विट केले आहे, जो व्हायरल होत आहे. ट्विटमध्ये आपला फोटो शेअर करताना बाबरने लिहिले की, आनंदी राहण्यासाठी फार काही करण्याची गरज नाही.

या ट्विटवर काही लोकांनी बाबरच्या समर्थनार्थ प्रत्युत्तर दिले आहे, तर काहींनी त्यांना जोरदार ट्रोल केले आहे. बाबर पाकिस्तान क्रिकेट संघाचा तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार आहे. एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपद बाबरकडून हिसकावले जाऊ शकते, अशी चर्चा अलीकडे आहे. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर बाबरने 47 कसोटी, 95 वनडे आणि 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT