Babar Azam tweet suryakumar yadav photo after his number 1 ranking in t20 career best t20i rating  
क्रीडा

Suryakumar Yadav : बाबर अझमला देखील SKY चे वर्चस्व मान्य; फोटो ट्विट करत म्हणाला…

सकाळ डिजिटल टीम

T20 World Cup 2022 नंतर, ICC ने आता T20 इंटरनॅशनल चे नवीन रँकिंग जाहीर केले आहे. विश्वचषकात खेळल्या गेलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचाही या क्रमवारीत समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्य कुमार यादव पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. यानंतर पाकचा कर्णधार बाबर आझमने सूर्याचा फोटो ट्विट केला आहे.

यावेळी त्याने पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानपेक्षाही अधिक आघाडी घेतली आहे, म्हणजेच आता सूर्यकुमार यादवशी बरोबरी करणे रिझवानसाठी कठीण काम झाले आहे. भारताच्या सूर्य कुमार यादवशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला पहिल्या 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळालेले नाही. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आता आणखी खाली गेला आहे, तो आधी 11व्या क्रमांकावर होता, मात्र आता तो थेट 13व्या क्रमांकावर घसरला आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमलाही चांगलाच फटका बसला आहे.

हेही वाचा - Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सूर्यकुमार यादवचा फोटो ट्वीट केला आहे. यासोबत त्याने लिहिलेलं कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बाबरने निळ्या आकाशाखाली निवांत असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. फोटोमध्ये निळ्याशार आकाशाखाली सूर्या उभा असल्याचे दिसत आहे. या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणावर कमेंट देखील करत आहेत.

तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात सुर्याने १३ धावा केल्या होत्या, त्यानुसेर त्याचे रेटींग पॉईंट्स ८९० झाले आहेत, त्याच्या खाली दुसऱ्या क्रमांकावर मोहम्मद रिझवान ८३६ पॉईंट्स आहेत. न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे ७८८ सह तिसऱ्या तर बाबाज आजम ७७८ पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT